पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-१३४ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण पार्लमेंट बोलाविण्याचं टाळलें ! यानंतर इंग्लंडच्या राज्यव्यवस्थेसंबंधीं . क्रॉमवेलच्या अनुयायांनींच एक घटना तयार केली. या नवीन घटनेप्रमाणे अंमलबजावणीचे सर्व अधिकार क्रॉमवेलच्या नेतृत्वाखालीं असलेल्या एका मंडळाच्या ताब्यांत देण्यांत आले असून कायदे करण्यासाठी एकाच -गृहाचें एक पार्लमेंट स्थापन करण्यांत आलें ! या पार्लमेंटमध्यें राजपक्षीय मंडळीचा शिरकाव होऊं न देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला होता है - सांगावयास नकोच ! क्रॉमवेलला 'राष्ट्ररक्षक' हा किताब मिळतो. अशारीतीनें इंग्लंडच्या राज्यव्यवस्थेसंबंधी ही नवी घटना तयार झाल्यावर क्रॉमवेलनें १५६३ पासून १५६८ पर्यंत एकंदर पांच वर्षे 'राष्ट्र- रक्षक' या नांवानें इंग्लंडवर आपला अंमल गाज- विला. परंतु या अवधींत त्यास कितीतरी कठीण प्रसंगांशी झगडावें लागलें ! त्यानें बोलाविलेल्या पहिल्या पार्लमेंटने राज्यव्यवस्थेसंबंधीं दुसरी घटना करणें अत्यावश्यक आहे असें सूचित केल्यामुळें त्यानें तें पार्लमेंट मोडून टाकून एक वर्षभर पार्लमेंटच्या मदतीखेरीज राज्यकारभार केला. या अवधींत क्रांतिकारक व चळवळ्या लोकांनीं त्याच्यावर कितीतरी प्राणघातक संकटें आणलीं होतीं, परंतु त्यानें मोठ्या धैर्यानें सर्व संकटांशी तोंड दिलें. यानंतर पार्लमेंटच्या संमतीनेंच राज्यकारभार करावा असें वाटल्यावरून त्यानें १६५६ मध्ये दुसरें एक पार्लमेंट बोलाविलें. या नवीन पार्लमेंटमधील सभासदांस प्रजा- सत्ताक राज्याऐवजीं इंग्लंडमध्ये राजसत्ताच असावी असें वाटून त्यांनीं क्रॉमवेलला राज्यपद देऊं केलें; परंतु क्रॉमवेलनें तें स्वीकारिलें नाहीं ! या पार्लमेंटच्या संमतीनें दोन वर्षे राज्यकारभार केल्यावर पार्लमेंट व क्रॉमवेल यांच्यामध्यें कलह होऊन १६५८ मध्ये हेंही पार्लमेंट क्रॉमवेलला मोडून • टाकावे लागलें. क्रॉमवेलला अशाप्रकारे वरचेवर पार्लमेंटची सत्ता उलथून द्यावी · लागे तरी त्याच्या अमदानीत इंग्लंडमध्यें सर्वत्र स्थिरस्थावरता राहून इंग्लंडचें