पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३६ इंग्लंडमधील बेबंदशाही. युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण चीं सर्व सूत्रे देण्यांत आलीं होतीं. परंतु रिचर्ड आपल्या बापाप्रमाणें कर्तृत्ववान् नसल्यामुळें त्यास स्वस्थता राखतां आली नाहीं. यानंतर सैन्याच्या ताब्यांत राज्यकारभाराचीं सर्व सूत्रे जाऊन इंग्लंडमध्ये • सर्वत्र बेबंदशाही माजूं लागली. यानंतर १६४० मध्यें भरलेलें पार्लमेंटही पुनरपि चमकूं लागलें. अशाप्रकारें सर्वत्र गोंधळ व अनास्था माजून राहिल्यानें स्थिरस्थावरता करण्यासाठी पुनरपि राजसत्ता स्थापन केल्याखेरीज गत्यंतर नाहीं असें प्रत्येक विचारी माणसास वाटू लागलें. यावेळीं क्रॉमवेलच्या कारकीर्दीत प्रसिद्धीस आलेल्या मंक नांवाच्या सेनापतीनें पुढाकार घेऊन १६४० मध्ये जमलेल्या पार्लमेंटच्या वर्तनें - अर्थात् सर्व राष्ट्राच्या वतीनें - २ या चार्लसला इंग्लंडचें राज्यपद देऊं केलें. गेल्या ११ वर्षांत इंग्लंडमध्यें राज्यक्रान्ति घडवून ज्यांनी भाग घेतला होता, त्यांस कोणत्याही प्रकारची शिक्षा न करण्याचें चार्लसकडून अभिचवन घेतल्यावर त्यास इंग्लंडच्या सिंहासनावर बसविण्यांत आलें. इंग्लंडमध्यें पुनरपि राजसत्ता स्थापन होते. २रा चार्लस १६६० ते १६८५. २ रा जेम्स १६८५ ते १६८८. गेल्या ११ वर्षांमध्यें इंग्लंडमध्यें प्युरीटनपथीय लोकांनी प्रजासत्ता राज्यपद्धतीचा जो प्रयोग करून पाहिला होता, तो पार फसला जाऊन पुन: १६६० सालीं इंग्लंडमध्यें राजसत्ता स्थापन करणें भाग पडलें इतकेंच नव्हे वर प्युरीटन लोकांनीं आपल्या अमदानीत धार्मिक बाबतीत निरस व डामडौलव्यतिरिक्त अशी रुक्ष पद्धत पाडली होती, तिच्या ऐवजीं ऐषआराम व डामडौल यांनी युक्त अशी पूर्वापार पद्धत अम- लांत आणण्याची आवश्यकता प्रत्येकास भासूं लागली ! इंग्लंडमध्यें राजसत्ता प्रस्थापित करण्यांत आल्यावर, नवीन घटनें- प्रमाणें जें पार्लमेंट बोलाविण्यांत आलें ( १६६१ ) तें प्रतिगामी धोरणाचे