पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ वं. 1 सतराव्या शतकांतील इंग्लंड. १३३ तरी आयर्लंड व स्कॉटलंड या दोन देशांना इंग्लंडने केलेली व्यवस्था मान्य नसल्यामुळे त्यांनी २ रा चार्लस हाच आपला आयर्लंड व स्कॉट- लंड येथील बंड. राजा असल्याची द्वाही फिरविली होती; परंतु हे दोन देश आपणापासून विभक्त होऊं देणें इंग्लंडला इष्ट वाटलें नाहीं. स्कॉटलंड व आयर्लंड हे दोन देश पूर्णपणें आपल्या वर्चस्वाखाली आणण्याच्या इराद्यानें क्रॉमवेल स्वतः मोठें सैन्य घेऊन पहिल्याप्रथम आयर्लंडमध्यें गेला. तेथे गेल्यावर ड्रोघेडा व वेक्सफोर्डे या दोन ठिकाणीं ( १६४९ ) आयरिश लोकांची कत्तल करून तो देश आपल्या अंकित केला. यानंतर क्रॉमवेलने आपला मोर्चा स्कॉटलंडकडे वळवून १६५० मध्ये त्यानें डनबार येथें स्कॉटिश सैन्याचा पुरा मोड. केला; त्यानंतर २ या चार्लसच्या हाताखालील सैन्याचा बुरसेस्टर या ठिकाणीं ( १६६१ ) फडशा पाडल्यावर क्रॉमवेलच्या विरुद्ध शस्त्र उप- । सण्यास कोणींच धजावलें नाहीं ! वुरसेस्टर येथे झालेल्या पराभवानंतर मात्र चार्लस यास महत्प्रयासानें लपून छपून इंग्लंडमधून युरोपखंडांत पळ काढावा लागला ! आयर्लंड व स्कॉटलंड येथें स्थिरस्थावरता झाल्यावर आतां इंग्लंड-. च्या राज्यव्यवस्थेची एखादी कायमची घटना करण्याची अवश्यकता प्रत्येकास वाटूं लागली. परंतु अशाप्रकारें नवीन घटना तयार झाल्यास आपली सत्ता अर्थातच कमी होणार असें ५०-६० सभासदांच्या पार्लमेंट- ला वाटत असल्यामुळे, नवीन घटना तयार करण्याचे काम या पाल- मेंटचें कांहीं अनुकूल मत नव्हतें. पार्लमेंटच्या हातून नवीन घटना तयार करण्याच्या कामी मदत मिळणार नाहीं हें पाहतांच क्रॉमवेलनें १६५३. मध्ये आपल्या सैन्यानिशीं पार्लमेंटगृहावर हल्ला करून तेथील सभासदांस हांकून लावलें. अशाप्रकारें जुन्या पार्लमेंटचें अस्तित्व संपुष्टांत आल्यावर नवीन निवडणूक होऊन नवें पार्लमेंट स्थापन करणेच इष्ट होतें; परंतु राजपुत्र चार्लस यास कदाचित् बोलावण्यांत येईल अशी भीति वाटून क्रॉमवेल