पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण दिलें ( १६४७). चार्लस ताब्यांत आल्यावर आतां राज्यव्यवस्थेची घटना कशारीतीने करावयाची हे ठरविण्यासाठी पार्लमेंट सभेमध्यें खडा- जंगी वादविवाद होऊं लागला. यावेळीं ऑलिव्हर क्रॉमवेलनें आपल्या मताप्रमाणें वागणाऱ्या ५०-६० सभासदांखेरीज बाकीच्या सर्व सभासदांस सभागृहांतून हांकून लावलें (१६४८). अशाप्रकारें ऑलिव्हर क्रॉमवेल- च्या पूर्णपणे हुकमतीखालीं असलेल्या पार्लमेंटनें चार्लसची चौकशी करण्या- साठीं एक न्यायकोर्ट स्थापन केलें. या कोर्टाकडून चार्लसवर देश- द्रोहाचा आरोप ठेवण्यांत येऊन फांशीची शिक्षा सांगण्यांत आली; व ३० जानेवारी १६४९ रोजी त्यास स्वतःच्याच राजवाड्यासमोर फांशी जावें लागलें ! ! वरील प्रकारचें न्यायकोर्ट स्थापन करूल राजाची चौकशी करणें अत्यावश्यक आहे कीं नाहीं याविषयीं वादविवाद चालला असतां लॉर्डींच्या सभेनें, अशा प्रकारचें कोर्ट स्थापन करण्याविरुद्ध आपले मत दिलेलें पाहून क्रॉमवेलनें आपल्या सैन्याच्या मदतीनें ती बड्या लोकांची सभा पार उधळून टाकली होती; व कॉमन्स सर्भेत असलेले ५०-६० सभासद क्रॉमवेलला दचकून त्याच्याच तंत्रानें वागत असल्यामुळे चार्लस राजास फांशी देण्यांत आल्यावर इंग्लंडमधील सर्व संत्ता क्रॉमवेलाच्याच पूर्णपणे हाती गेली होती असे म्हणावयास पाहिजे ! लोकसत्ताक राज्यपद्धति. ( १६४९ - १६६० ) राजास फांशी देण्यांत आल्यावर ५०-६० सभासदांच्या पार्लमेंटनं इंग्लंड प्रजासत्ताक झाल्याचा ठराव पास करून एक मंडळ स्थापन केलें व त्या मंडळाकडे राज्यकारभाराचे सर्व अधिकार सोपविण्यांत आले. इंग्लंडमध्यें जरी अशाप्रकारें प्रजासत्ताक राज्य स्थापन झालें होतें