पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९. ] सतराव्या शतकांतील इंग्लंड. १३१ मध्ये महत्त्वाच्या सुधारणा घडून येऊन पालैमेंटचें सैन्य खरोखरीच उत्कृष्ट झालें. अशारीतीनें क्रॉमवेलच्या देखरेखीखाली तयार झालेल्या पार्लमेंट- च्या सैन्यानें लवकरच आपला प्रभाव दाखविला. १६४५ मध्ये नेसवी- जवळ पार्लमेंटच्या सैन्याकडून चार्लसचा पराभव होऊन त्यास पळ लागला; व यानंतर एक वर्षपर्यंत दम धरून आतां कांहीं आपली धडगत लागणार नाहीं हैं लक्षांत येतांच स्कॉटिश लोकांचा आश्रय घेण्याचें चार्लसनें ठरविलें (१६४६). इंग्लिश पार्लमेंट व स्कॉटिश लोक यांच्यामध्ये १६४३ पासूनच स्नेहसंबंध घडून आला होता, परंतु हा संबंध घडून येण्यापूर्वी पार्लमेंटला भलतीच अट कबूल करावी लागली होती, व ती अट म्हणजे पार्लमेंटनें इंग्लंडमध्ये प्रेसबिटेरियन पंथाचा प्रसार करावा ही होय ! परकीय लोकांनी अशा प्रकारें आपल्यावर धर्मपंथ लादण्याचा प्रयत्न करावा ही गोष्ट पार्लमेंटमधील प्युरीटन पंथीय सभासदांस देखील पहिल्या प्रथम आव- डली नाहीं; परंतु १९६४३ च्या सुमारास राजाशीं टक्कर देण्यास त्यांना स्कॉटिश लोकांची मदत निदान तटस्थपणा अत्यावश्यक असल्यामुळें त्यांनी ही गोष्ट नाइलाजास्तव कबूल केली ! वरील प्रकारें स्कॉटलंडची मदत घ्यावी किंवा नाहीं याविषयीं वादविवाद सुरू असतां, पार्लमेंटमधील कांहीं सभासदांनीं स्कॉटिश लोकांची मदत घेण्याविरुद्ध आपले मत दिलें होतें, व या लोकांस कॉम- वेल व त्यांचे अनुयायी यांचेही पाठवळ असे ! १६४५ मध्यें नेसवी येथें झालेल्या लढाईत राजाचा पूर्ण पराभव झाल्यामुळे, आतां राजसत्तेपासून आपणास भीति नाहीं हें पहातांच प्रेसविटेरियन व क्रॉमवेलच्या विचा- राचे प्युरीटन लोक यांच्यामधील मतभेद विकोपास जाऊं लागला. इकडे, चार्लस राजा स्कॉटिश लोकांस शरण गेल्यावर त्यांनीं त्यास आश्रय देण्याऐवजी चांगली खंडणी घेऊन पार्लमेंटच्या ताब्यांत