पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण चार्लसने लंडन शहर आपणाविरुद्ध उठलें आहे हें पहातांच लंडनमधून पळ काढला; व १६४२ च्या ऑगस्ट महिन्यांत नॉटिंगहॅम या ठिकाणी आपला तळ देऊन, सर्व राजनिष्ठ प्रजाजनास आपणास येऊन मिळण्या- विषयीं जाहीर सूचना दिली. राजाचा असा प्रयत्न पहातांच पार्लमेंटनें ही आपले सैन्य जमा केलें. १६४२ च्या सुमारास राजा व पार्लमेंट यांच्या सैन्याची तुलना केल्यास राजाचे सैन्यच अधिक बलाढ्य असल्याचें आपणास दिसून येईल.. त्यामुळे पहिल्या कांहीं लढायांत पार्लमेंटचा एकसारखा पराभव होत गेला;. व एकदां तर पार्लमेंटच्या ताब्यांत असलेलें मुख्य ठिकाण जें लंडन शहर तें देखील राजाच्या ताब्यांत जातें कीं काय असें वाटू लागलें ! परंतु हलके हलके १६४४ च्या सुमारास पार्लमेंटचें सैन्य सुव्यवस्थित रीतीनें ठेवण्याचा प्रयत्न होऊ लागल्यामुळे ती स्थिति पार पालटून गेली ! ऑलीव्हर कामवल. यावेळीं ऑलीव्हर क्रॉमवेल नांवाचा पुरुष उद्यास येऊन त्यानें पाल- मेंटची बाजू उचलून धरून राजसत्ता उलथून पाडण्यासाठीं जीं महत्त्वाची कामें केलीं त्यामुळें त्याचें नांव इतिहासांत अज-- रामर झालें आहे. क्रॉमवेलचा लहानपणापासूनच प्युरीन पंथाकडे कल होता; व त्यास इतर प्युरी- टनपंथीय लोकांचें पाठबळ मिळून उत्तम प्रकारचें लष्करी शिक्षण घेतलेलें सैन्य जय्यत तयार ठेवतां आलें. १६४४ मध्ये मार्स्टनमूर या ठिकाणीं झालेल्या चकमकीत कॉमवेलनें आपल्या देखरेखेखालीं तयार झालेल्या सैन्याच्या मदतीनें राजाचा पुतण्या रूपर्ट याच्या हाताखालील सैन्याचा पूर्णपणे पराभव करून आपल्या सैन्याची ताकद सर्वांच्या निदर्शनास आणली. यानंतर त्यानें पार्लमेंटच्या हातांतील सैन्यास योग्य प्रकारें लष्करी शिक्षण देणे अत्यावश्यक आहे, व तसें झाल्याखेरीज आपणांस राजाचा पूर्णपणें पराभव करतां यावयाचा नाहीं, अशाप्रकारची कडक टीका पार्लमेंटसभेमध्यें केल्यामुळे, क्रॉमवेलच्या सूचनेप्रमाणें सैन्या-