पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ वें. ] सतराव्या शतकांतील इंग्लंड. १२७ चीड आली. सरकारकडून हा कर वसूल करण्याचा उपक्रम सुरू झाल्यावर जॉन हॅम्पडन. जॉन हॅम्पडन यानें हा कर बेकायदेशीर आहे असें सांगून तो देण्याचं साफ नाकारलें; व यामुळें त्यास न्यायकोर्टापुढे उभे करण्यांत आलें. न्यायाधीशांनीं राजसत्तेस घाबरून जाऊन जॉन हॅम्पडन याच्या विरुद्ध निकाल दिला; तरी देखील या प्रसंगाने लोकांच्या मनांत राजाच्या विरुद्ध तिट्कारा उत्पन्न होऊन योग्य संधि सांपडतांच इंग्लिश जनता राजसत्ता उलथून पाडण्याचा प्रयत्न करील असें स्पष्ट दिसूं लागलें; व अशा प्रका- रची संधि तिला लवकरच मिळाली. १६३७ मध्ये चार्लसनें स्कॉटलंडमधील प्रेसबिटेरियन पंथाच्या लोकांवर, इंग्लंडमध्यें सुरू असलेला एपिस्कोपेलियन पंथ व प्रार्थनेचें पुस्तक लादण्याचा प्रयत्न केला. चार्लसची ही कृति पाहून स्कॉटिश लोकांस अर्थातच चीड आली व त्यांनीं चार्लसच्या कृतीचा निषेध करण्यासाठी . एक सभा भरवून त्या ठिकाणीं धार्मिक बाबतींत कोणी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा प्रतिकार करण्याची शपथ घेतली. स्कॉटिश जेम्सचा स्कॉटिश लोकांशी कलह. लोकांचा हा दृढनिश्चय पाहून चार्लसनें त्यांच्यावर एपिस्कोपोलयन पंथ लादण्याचें सोडून व्यावयास पाहिजे होतें; परंतु चार्लस- कडून तसें कांहींच होण्याचा रंग दिसत नाहीं हें पाहून स्कॉटिश लोकांनी बंड पुकारलें ! बंडखोर स्कॉटिश लोकांना ताळ्यावर आणण्यासाठी तिकडे सैन्य रवाना करण्यांत आलें; परंतु तें सैन्य अगदींच कमकुवत व अव्यवस्थि असल्यामुळे, त्या सैन्याचा पराभव होऊन चार्लसला तह करणें भाग पडलें. परंतु आपला पराभव झाल्याचें कबूल करून स्वस्थ बसणें चार्लस- ला आवडलें. नाहीं, तर पुनः एक मोठें सैन्य स्कॉटलंडकडे पाठवून स्कॉटिश लोकांची खोड मोडावी असें चार्लसला बाटूं लागलें. परंतु अशा