पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२६ चार्लस चें अनियंत्रित व बेकायदेशीर वर्तन ( १६२९-१३४०). युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण आपणास ' टनेज व पाऊंडेज' हे दोन कर देण्याचें नाकारलेले पाहून चार्लसला चीड आली व त्यानें आतां पार्लमेंटसभा बोलाविल्याखेरीज राज्यकारभार करण्याचें ठरविलें; व या पुढील ११ वर्षे त्यानें पार्लमेंटसभा न बोलावितां जुलमी व बेकायदेशीरपणाची कृत्ये करून राज्यकारभार केला. या वेळीं धार्मिक बाबतींत त्याचा मुख्य सल्लागार 'लॉड ' नांवाचा धर्माधिकारी होता. यास १६३३ मध्यें चार्लसनें कँटरबरीचा मुख्य धर्माधिकारी केलें. लॉड हा एपिस्कोपेलियन पंथाचा अनुयायी होता तरी रोमन कॅथलीक पंथाप्रमाणेच कांहीं थोडे फार संस्कार व आचार एपिस्कोपेलियन पंथामध्येही अस्तित्वांत असावेत असे त्यास वाटत असल्यामुळे, प्युरीटन पंथाकडे ज्यांचा नकळ- तच कल जात होता अशा इंग्लिश बहुजनसमाजास त्याच्याविषयीं तिटकारा वाटूं लागला. राजकीय बाबतींत थॉमस वेंटवर्थ (पुढें स्ट्रॅफोर्ड या नांवानें प्रसिद्धीला येणारा गृहस्थ ) चार्लसचा मुख्य सल्लागार असून, अनियंत्रित राजसत्तेचा हा पुरस्कर्ता असल्याने याच्याबद्दलही लोकांस तिटकारा वाटूं लागला ! वेंटवर्थ यानें केलेल्या जुलमी व अन्यायाच्या गोष्टींपैकीं जहाजें बांधण्यासाठी म्हणून पार्लमेंटच्या संमतीशिवाय लोकांवर कर लादणें ही गोष्ट : प्रमुख होय ! राष्ट्रावर एखादें परचक्र येण्याचा संभव असला म्हणजे राष्ट्राचें संरक्षण करण्यासाठीं समुद्रकिनाऱ्यावरील शहरांकडून राष्ट्राच्या आरमारासाठीं कांहीं जहाजें घेण्याचा प्रघात पूर्वी होता ! परंतु आतां, वेंटवर्थनें राष्ट्रावर परचक्र येण्याची कोणत्याच प्रकारची भीति नसतां पार्ल- Ship- money. जहाजांसाठी कर. मेंटच्या संमतीखेरीज, समुद्रकिनाऱ्यावरील शहरांकडून जहाजें घेण्या- ऐवजीं उक्ती रक्कमच सक्तीनें घेण्याचें ठरवल्याचें पाहून लोकांस अर्थातच