पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ युरोपचा अर्वाचीन इतिहास [ प्रकरण प्रकारचें सैन्य तयार करण्यासाठी पैशाची फारच अवश्यकता होती, व आतां पार्लमेंटच्या संमतीशिवाय अशाप्रकारची रक्कम आपणास जमा करतां यावयाची नाहीं हें पाहून नाइलाजास्तव त्यास १६४० मध्ये पार्लमेंटची बैठक बोलवावी लागली ! १६४० साली भरलेल्या पार्लमेंटनें चार्लसला स्कॉटिश लोकांबरो" बर युद्ध करण्यासाठी रक्कम मंजूर करण्याऐवजीं गेल्या दहा वर्षात राष्ट्रावर झालेल्या अन्यायाच्या व जुलमी कृत्यांचा उल्लेख केलेला पाहून चार्लसला राग आला व त्यानें तें पार्लमेंट लागलीच मोडून टाकलें. त्यानंतर पार्लमेंट- कडुन पैशाची मंजुरी मिळण्याची वाट न पहातां आज नाहीं उद्या आपण खर्च केलेल्या रकमेची मंजुरी पार्लमेंटाला द्यावी लागेल या आशेनें त्यानें दुसरें एक सैन्य स्कॉटिश लोकांची खोड मोडण्यासाठीं रवाना केलें. परंतु या सैन्याचीही पूर्वीप्रमाणेंच वाट लागून, त्यास परत फिरावें लागलें. cament parlia पुष्कळ काळपर्यंत टिकलेलें पार्लमेंट १६४०. यानंतर थोड्याच दिवसांनी राज्यकारभाराच्या खर्चाची बरीच ओढाताण होऊं लागल्यामुळें चार्लसला पुनः एकदां पार्लमेंटची बैठक भरवावी लागली ( १६४० ). हें पार्लमेंट एकंदर वीस वर्षेपर्यंत टिकलें असून याकडून करण्यांत आलेल्या महत्त्वाच्या गोष्टीं- मुळे हैं इतिहासांत संस्मरणीय आहे. या पार्लमेंटने आपल्या अधिवेशनाच्या सुरवातीस एक महत्त्वाचा ठराव पास केला व तो ठराव म्हणजे या सभासदांच्या संमतीशिवाय हें पार्लमेंट मोडून टाकण्यांत येऊ नये हाच होय. यानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे या पार्लमेंटनें आपल्या हातीं घेतलीं. गेल्या ११वर्षांमध्यें आर्चबिशप लॉड व राजमंत्री स्ट्रॅफोर्ड यांनी जीं जुलमाचीं व बेकायदेशीर कृत्यें केलीं होतीं त्याबद्दल या दोघांस फांशीं देण्यांत आलें. राज्यकारभाराची एक नवीन घटना तयार करण्यांत येऊन राजाची अनियंत्रित सत्ता बरीच मर्यादित करण्यांत आली. या पार्लमेंट-