पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ . ] सतराव्या शतकांतील इंग्लंड. १२५ - सत्ता धाब्यावर बसवून आपल्या स्वतःच्याच अधिकारानें वाटेल तीं कृत्येंक- रण्याचे ठरविलें ! लोकांच्या इच्छेप्रमाणें बकिंगहॅम यास कामावरून दूर करण्या- ऐवजीं ‘ला रोशेल’ येथील ह्युगेनॉट लोकांच्या मदती- बकिंगहॅमचा खून १६२८. साठीं पाठविण्यांत येणाऱ्या आरमाराचें नेतृत्वही त्यासच पुनः देण्यांत आलें ! चार्लसची ही चीड आण- ण्यासारखी कृति पाहून जॉन फेल्टन नांवाच्या एका गृहस्थानें 'पोर्टस माऊथ' या बंदरावर बकिंगहॅमचा खून केला (१६२८). आपल्या मर्जीतील सरदाराचा वध झालेला पाहून चार्लसला फारच वाईट वाटले; परंतु या प्रसंगानें कांहींच बोध न घेतां पार्लमेंटच्या सत्तेस विरोध • करून, ती सत्ता धाब्यावर बसविण्याचें धोरण चार्लसनें सोडलें नाहीं ! राज्यारोहणाच्या दिवशीं आयात मालापैकीं कांहीं जिनसांवर ' टनेज व पाऊंडेज' नांवाचे दोन कर आपल्या स्वतःच्या अधिकारावर बसविण्याची परवानगी राजास पार्लमेंटकडून मिळत असे. या दोन करांचें उत्पन्नही बरेंच असल्यामुळे पार्लमेंटची बैठक न बोला- बितां देखील, काटकसर करून राजास आपल्या खर्चाची व उत्पन्नाची तोंडमिळवणी करतां येई. परंतु चार्लसच्या दुर्दैवानें तो गादीवर आला 'त्यावेळी अशाप्रकारें ' टनेज व पाऊंडेज' नांवाचे दोन कर बसविण्याची परवानगी केवळ नजरचुकीनें त्यास पार्लमेंटकडून देण्यांत आली नव्हती, व आतां राजाचें असें जुलमी व बेकायदेशीरपणाचें वर्तन पाहून हे दोन कर बसविण्याची परवानगी देण्याचें पार्लमेंटनें साफ नाकारलें. पार्लमेंटचे असें उद्धट वर्तन पाहून चार्लसला राग आला व त्यानें १६२९ मध्ये पार्लमेंट सभा एकाएकीं रद्द केली. परंतु यापूर्वीच या पार्लमेंटकडून एक महत्त्वाची गोष्ट करण्यांत आली, व ती गोष्ट म्हणजे पार्लमेंटच्या संमती- शिवाय टनेज व पाऊंडेज हे दोन कर राजाने लोकांवर लादल्यास ते बेकायदेशीर आहेत असें जाहीर करणेंच हीच होय ! अशाप्रकारें धार्मिक बाबीप्रमाणें राजकीय बाबीमध्येही चार्लसने - आपल्या प्रजेची अप्रियताच संपादन केली ! १६२९ च्या पार्लमेंटनें