पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण आपल्या अधिकाराची जाणीव होती; व आपल्या संमतीखेरीज राजास कोणत्याही प्रकारचे कर बसवितां येत नाहींत राजा व पार्लमेंट. असें पार्लमेंटनें जाहीर केल्यामुळें त्याच्या अम- दानात पार्लमेंट व राजा यांच्यामधील कलह विकोपास जाऊन बिचाऱ्या चार्लसला फांसावर चढावें लागलें. राजा व प्रजा यांच्या- मध्यें धार्मिक प्रश्ना- संबंधी वितुष्ट. चार्लसनें गादीवर येतांच फ्रान्सचा राजा १३ वा लुई याची बहिण हेन्रीआटा मेरिया हिच्याशी लग्न केलें. फ्रान्ससारख्या कट्ट्या रोमन कॅथलीक पंथाच्या राष्ट्राशीं चार्लसने अशाप्रकारचा संबंध केला इतकेंच नव्हे तर रोमन कॅथलीक पंथाच्या लोकांस कांहीं सवलती देण्याचें त्यानें अभिवचन दिलेलें पाहतांच इंग्लिश जनतेस चार्लसचा मनस्वी राग आला. रोमन कॅथलीक पंथाच्या लोकांस धार्मिक बाबतींत सवलती देऊन चार्लसनें उदार धोरणाचा अंगीकार केला असला तरी चार्लसविषयीं लोकांचें मन शुद्ध नसल्यामुळे, त्याच्या हेतू- विषयीं लोकांचें मन साशंकच होते. इंग्लंडमध्यें पुनः रोमन कॅथलीक पंथाचाच प्रसार व्हावा याच हेतूनें चार्लसनें वरील सवलती दिल्या आहेत असें इंग्लिश जनतेस वाटूं लागलें व चार्लसचा हेतु हाणून पाडण्यासाठी जनतेकडून प्रयत्न होऊं लागले. अशाप्रकारें धार्मिक प्रश्ना- संबंधीं कलह विकोपास जाऊन रोमन कॅथलीक धर्माधिकारी व त्यांचे आचारविचार यांवर कडक टीकाप्रहार करण्याचा प्रयत्न करीत असतां इंग्लिश जनतेचा कल, त्यांच्या एपिस्कोपेलियन या नेमस्त प्रॉटेस्टटपंथा- कडून प्युरीटन या ज्वलज्जहाल प्रॉटेस्टंट पंथाकडे जाऊं लागला; तो इतका 'की थोड्याच वेळांत सर्व इंग्लिश जनतेनें नकळतच प्युरीटन पंथाचाच अंगीकार केला असल्याचे भासूं लागलें. " धार्मिक प्रश्नासंबंधानें इग्लिश जनतेशीं अप्रियता संपादन करून घेत असतां चार्लसनें राजकीय बाबतीत पार्लमेंटशीं वितुष्ट संपादन करून घेतलें. चार्लस गादीवर आला त्यावेळीं स्पेनशीं लढाई सुरू होती; तेव्हां