पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व.] सतराव्या शतकांतील इंग्लंड. १२३ या लढाईच्या खर्चासाठीं रक्कम मंजूर करून घेण्यासाठीं त्यानें पार्लमेंट बोलाविलें. पार्लमेंटनें यावेळीं युद्धासाठी रक्कम मंजूर करून हुशार सेनापतीच्या व्यवस्थेखालीं लढाईची सर्व तयारी व्हावी असें सुचविलें. परंतु चार्लसनें या सूचनेकडे दुर्लक्ष करून आपल्या मर्जीतल्या बकिंगहॅम नांवाच्या एका गृहस्थाची मुख्य सेनापति म्हणून या मोहिमेवर रवानगी केली. बकिंगहॅम यास युद्धकलेची कांहींच माहिती नसल्यामुळे त्याच्या नेतृत्वाखालीं पाठविलेल्या मोहीमेचा पूर्णपणे पराभव झाला ! बकिंग- हॅमच्याच नालायकीमुळें ही मोहीम फसल्यामुळे, त्यास कामावरून काढल्या- खेरीज आपण युद्धाची रक्कम मंजूर करणार नाहीं असें पार्लमेंटनें बजा- वलें. पार्लमेंटचें अशा प्रकारचें उद्धट वर्तन पाहून चार्लसनें तें पार्लमेंट मोडून नवीन पार्लमेंट बोलाविलें; परंतु या पार्लमेंटनेंही पूर्वीच्या पार्लमेंट- प्रमाणेंच आपलें मत जाहीर केल्यामुळे चार्लसला हेंही पार्लमेंट पूर्वी- प्रमाणेंच मोडून टाकावें लागलें ! पार्लमेंट व राजा यांच्यामध्ये अशाप्रकारें सलोख्याचा संबंध नव्हता तरी देखील चार्लसनें ह्युगेनॉट लोकांस मदत करण्यासाठी फ्रान्स- विरुद्ध युद्ध सुरू केलें. ह्युगेनॉट लोकांच्या समुद्रकिनाऱ्यावरील ला-रोशेल या किल्ल्यास फ्रान्सच्या राजानें वेढा घातल्यामुळें, तो वेढा उठ- विण्यासाठीं एक चांगलें आरमार पाठविणें अत्यावश्यक होतें, परंतु पैशाची फ्रान्सशीं . युद्ध १६२७. चांगली कुमक असल्याखेरीज आरमार कसें पाठ- वावयाचें हाच चार्लस पुढें प्रश्न होता ? खर्चाची रक्कम मंजूर करण्याकरितां पार्लमेंटची बैठक बोलाविल्यास पार्लमेंटकडून आपल्या हातांतील सत्ता घेण्यांत येईल अशा भीतीनें चार्लसनें पार्लमेंटची बैठक न बोलावितां आपल्या स्वतःच्याच जबाबदारीवर श्रीमंत लोकांकडून सक्तीनें कर्जाऊ रक्कम घेण्याचा उपक्रम सुरू केला. अशा प्रकारें पैशाची तरतूद करून घेतल्यावर चार्लसनें बकिंगहॅमच्या हाताखालीं ' ला-रोशेल ' किल्ल्याचा वेढा उट-