________________
९ वें. ] सतराव्या शतकांतील इंग्लंड. १२१ मध्यें व्हर्जिनिया नांवाची एक वसाहत स्थापन करण्यांत आली. यानंतर १६२० मध्यें इंग्लंडमधील धार्मिक जुलमामुळे इंग्लंड देश सोडून निघाले- ल्या प्युरिटन लोकांनी अमेरिकेमध्ये दुसरी एक वसाहत स्थापन केली; व या लोकांच्या दीर्घ प्रयत्नानेंच या वसाहतीची उत्क्रांति होऊन तिचें पुढें ‘अमेरिकेतील संयुक्त संस्थानें' या नांवाचें एक बलाढ्य राष्ट्र स्थापन झालें. इकडे इलिझाबेदच्या कारकीर्दीत पूर्वेकडील राष्ट्रांशीं व्यापार करावा या हेतूनें स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीनें १६१२ मध्ये हिंदुस्थानांत आपली एक वखार स्थापन केली ! अशाप्रकारें इलिझाबेदच्या अमदानीत स्पेनसारख्या बलाढ्य राष्ट्राशीं टक्कर देऊन इंग्लंडने आपली सत्ता समुद्रा- वर प्रस्थापित केल्यावर, इतर खंडामध्ये आपल्या वसाहती स्थापन करा - व्यात अशी त्यांना इच्छा होऊन त्यांचे त्या दिशेने प्रयत्न सुरू झाले. पहिला चार्लस. ( १६२५-१६४९. ) जेम्सनंतर त्याचा मुलगा १ ला चार्लस १६२५ मध्ये इंग्लंडच्या गादीवर आला. जेम्सनें आपल्या अमदानीत प्युरीटनपंथीय लोक व पार्लमेंट यांच्याशीं वितुष्ट संपादन केलें असल्यामुळे चार्लसला पहिल्यापासून- च त्याचे परिणाम भोगावे लागले. या वेळीं चार्लसनें उदार धोरणानें राज्यकारभार करण्याचा प्रयत्न केला असता, तर त्यास लोकांचें प्रेम संपादन करणें अवघड गेलें नसतें. परंतु चार्लसचे विचार आपल्या बापा- प्रमाणेंच चमत्कारिक असल्यानें त्यास ती गोष्ट साध्य करून घेतां आली नाहीं ! राजा हा ईश्वराचाच अंश आहे या समजुतीवर त्याचा विश्वास होता ! राजाच्या हातांत अनियंत्रित सत्ता असावयास पाहिजे असें त्या वाटत होतें ! अशा प्रकारें त्यानें पार्लमेंटची सर्व सत्ता धाब्यावर बस- वून राज्यकारभार करण्याचा प्रयत्न केला ! परंतु या वेळी पार्लमेंटलाही