पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरणः च्या राजानें या सैन्याशीं कांहीं वेळ टक्कर दिली, पण सरते शेवटीं त्याचा पराभव होऊन १६२९ मध्यें लबेक येथें त्यास तह करणें भाग पडलें. या तहानें डेन्मार्कच्या राजास आपला सर्व गमावलेला मुलूख परत मिळाला, परंतु इतःपर जर्मनीमधील युद्धांत आपण भाग घेणार नाहीं असें त्यास अभिवचन द्यावें लागलें. त्त्वाकांक्षा. लबेक येथें डेन्मार्कच्या राजाशीं तह होण्यापूर्वीच वालेनस्टाईन या सर्व उत्तर जर्मनी काबीज केली असून आतां त्याच्या मनांत निराळे - च विचार घोळू लागले होते. जर्मनीमधील लहान लहान संस्थानें नाहीं- शीं करून, बादशहाच्या नेतृत्वाखालीं जर्मनीचें एक संघटित राष्ट्र स्थापन करावे अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती; व या वालेनस्टाईनची मह- दिशेनें प्रयत्न करण्याचा त्यानें उपक्रम केला. त्यानें बाल्टिक समुद्रापर्यंत सर्व उत्तर जर्मनी काबीज केली होती व आतां फक्त 'स्ट्रालसुण्ड' नांवाचें बाल्टिक समुद्रा- वरील आरमारी बंदर काबीज करण्याचा जरी त्याचा विचार होता तरी तें बंदर काबीज करण्याचे त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले ! स्वीडनचा महत्त्वाकांक्षी राजा गस्टाव्हस अडोल्फस याच्याकडून त्या आरमारी ठिकाणा- स कुमक मिळत असल्यामुळें वालेनस्टाईनचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत ! गस्टाव्हस हा महत्त्वाकांक्षी असून जर्मन युद्धांत आपण भाग घ्यावा असें त्यास पुष्कळ दिवसांपासूनच वाटत होतें, परंतु पोलंडच्या राजकारणांत हात घालून उत्तर व पूर्व युरोपवर आपलें वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असल्यामुळें जर्मन राजकारणांत हात घालण्यास त्यास इतके दिवस फुरसतच सांपडली नव्हती ! स्ट्रालसुण्ड हैं आरमारी ठिकाण घेण्यासंबंधाचे वालेनटाईनचे सर्व प्रयत्न जरी निष्फळ ठरले, तरी इतरत्र रोमन कॅथलीक पंथाचाच पूर्ण विजय