पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८ वे. ] जर्मनीतील तीस वर्षे टिकलेले धर्मयुद्ध. १०९ हात होता असें म्हणण्यास हरकत नाहीं. लबेकच्या तहानें डेन्मार्कच्या राजास जर्मन युद्धांतून आपलें अंग काढून घ्यावें रोमन कॅथलीक पंथाचा विजय. लागलें असून वालेनस्टाईन व टिली या दोन सेना- पतींनीं सर्व उत्तर जर्मनीवर आपले वर्चस्व स्थापन केलें होतें. अशा प्रकारें आपला सर्वत्र विजय झालेला पाहून २ या फर्डिनंड बादशहानें १६२९ मध्ये एक जाहीरनामा प्रसिद्ध केला, व . १५५५ मधील आग्जबर्गच्या तहानंतर जर्मनींतील प्रॉटेस्टंट पंथीय धर्मा- धिकाऱ्यांनी आपल्या ताब्यांत ठेवलेल्या चर्चच्या हुकमतीखालील जमिनी व मालमत्ता रोमन कॅथलीक पंथाच्या धर्माधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्याविषयीं फर्माविलें. बादशहाच्या या हुकमामुळे प्रॉटेस्टंट पंथीय लोकांचें बरेंच नुक- सान होत असल्यानें ते फारच चिडून गेले. अशाप्रकारें जर्मनीमध्ये रोमन कॅथलीक पंथाचें बरेंच वर्चस्व असल्यामुळे प्रॉटेस्टंट पंथाच्या अनुयायांचें कांहींच चाललें नसतें, परंतु प्रॉटेस्टंट पंथीय लोकांच्या सुदैवानें बादशहाने वालेनस्टाईन या प्रख्यात सेना- पतीस कामावरून काढून टाकल्यामुळें प्रॉटेस्टंट पंथाच्या अनुयायांचा अप्रत्यक्ष रीतीनें फायदाच झाला असें म्हणण्यास हरकत नाहीं. वालेन- स्टाईननें थोडक्याच काळांत आपला दरारा सर्वत्र बसविला असल्यामुळें वालेनस्टाईनला सेना- पतिपदावरून काढून टाकण्यांत येतें - १६३०. त्याच्याबद्दल इतर सरदारांस मत्सरभाव वाटूं लागला. याखेरीज सर्व जर्मन संस्थानांचे स्वातंत्र्य हरण करून संयुक्त जर्मनीचें एक संघटित राष्ट्र स्थापन करावे अशी त्याची महत्त्वाकांक्षा असून त्या दिशेनें त्याचे प्रयत्न चालल्यामुळे जर्मन संस्थानिकांस त्याचा राग येणें साहजिकच होतें. अशाप्रकारें वालेनस्टाईनचें वैभव कोणास पाहवलें नाहीं व १६३० मध्यें रॉटसबॉन येथें भरलेल्या जर्मन संस्थानिकांच्या बैठकींत, त्यास सेनापतिपदावरून काढून टाकण्याचें ठरून सर्व जर्मन संस्थानिकांनीं बादशहाकडे त्यासंबंधानें आग्रहाचें मागणें केल्यामुळें, बादशहास त्यांच्या विनंतीस नाइलाजास्तव रुकार द्यावा लागला !