पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८ . ] जर्मनींतील तीस वर्षे टिकलेलें धर्मयुद्ध. २०७ आली. इतर युरोपियन राष्ट्रांनाही जर्मन प्रॉटेस्टंटपंथीय लोकांबद्दल सहानुभूति वाटून या युद्धांत भाग घेण्याची इच्छा झाली, परंतु यावेळी डेन्मार्कच्या राजाखेरीज इतर राष्ट्रांनी या डेन्मार्क युद्धांत सामील होतें. युद्धांत प्रत्यक्ष लक्ष घातलें नाहीं. जर्मन प्रॉटेस्टंट- 'पंथीय लोकांच्या विनंतीवरून डेन्मार्कच्या राजानें या युद्धांत भाग घेण्याचें - ठरवितांच या धर्मयुद्धाचें पूर्वीचें आकुंचित क्षेत्र विस्तार पावून ते थोडेसे उत्तरेकडे सरकलें. सेनापति वालेनस्टाईन. ( विभाग २रा. ) प्रॉटेस्टंटपंथीय लोकांस जरी डेन्मार्कची मदत मिळाली होती; तरी रोमन कॅथलीक सैन्याचा सेनापति टिली यानें त्यांचा पराभव केला. या- नंतर कांहीं दिवसांनीं टिलीप्रमाणेंच वालेनस्टाइन नांवाच्या नुकत्याच प्रसिद्धीस आलेल्या सेनापतीनें बादशाही फौजेचें आधिपत्य स्वीकारून डेन्मार्कच्या राजाचा पूर्ण मोड केला. वालेनस्टाईन हा नुकताच प्रसिद्धीला आला असून त्यानें आपले वजन सर्वांवर बसविलें होतें. १६२५ च्या सुमारास बादशहा २ रा फर्डिनंड याच्याजवळ पैशाची पुरेशी कुमक नसल्यामुळे त्यास बादशाही फौज जमा करतां येईना ! परंतु या वेळीं वालेनस्टाईननं पुढें येऊन पैशाच्या मदतीखेरीज मोठी फौज जमा करतां येणें शक्य असल्याचें सुचविलें; व अशा प्रकारें फौज जमा करण्याबद्दल बादशहाची अनुमति मिळतांच, त्यानें एक फौज जमा करून त्यांच्या पगारासाठीं जिंकलेल्या प्रदेशांतील लोकांकडून सक्तीनें खंडणी गोळा करण्याचा उपक्रम सुरू केला. अशा प्रकारें बादशाही खजिन्याची यत्किंचितही मदत न घेतां वालेनस्टाईन यास बादशहाच्या बाजूनें लढण्यासाठी बरीच फौज तयार "ठेवतां आली ! १६२६ मध्यें वालेनस्टाईन व टिली यांच्या सैन्यानें प्रॉटेस्टंट पंथीय लोकांचा पुरा फडशा पाडून डेन्मार्कच्या राज्यावर स्वारी केली. डेन्मार्क-