पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण तील बंड मोडणें म्हणजे मोठें धर्मकृत्यच आपण करीत आहोंत असें त्यास वाटत असल्यामुळे त्याच्याकडून फर्डिनंडला सढळ हातानें मदत मिळाली. मॅग्झिमीलन व फर्डिनंड यांचें संयुक्त सैन्य आपणावर चालून येत आहे हें पाहातांच बोहिमिया प्रांतांतील प्रॉटेस्टंट लोकांनी पॅलेटाईनचा संस्थानिक फ्रेडरीक यास आपला सेनापति नेमून त्याच्या नेतृत्वाखालीं रोमन कॅथलीक पंथाच्या सैन्याशी तोंड देण्याची तयारी केली. परंतु फ्रेड- रीक हा अगदींच असमर्थ असल्यानें त्याच्याकडून कोणतीच कामगिरी सिद्धीस गेली नाहीं; इतकेंच नव्हे तर प्रेगजवळ व्हाईट हिलच्या लढाईत त्याच्या फौजेचा मोड होऊन त्यास पळ काढणे भाग पडलें ( १६२० ). फ्रेडरीकच्या सैन्याचा मोड केल्यावर मॅग्झिमीलन व फर्डिनंड यांनी पुनः बोहिमिया प्रांत आपल्या ताब्यांत घेतला. कॅथलीक पंथाचा • जय. बोहिमियामधील बंडामुळे उपस्थित झालेल्या युद्धाचा येथेंच निकाल लागला असता, परंतु आपणास मिळालेल्या जयानें चढून जाऊन आणखीही कांहीं गोष्टी साध्य झाल्या तर पाहाव्या असें बादशहा फर्डिनंड याच्या मनांत आलें. त्यानें एक जाहीरनामा प्रसिद्ध करून फ्रेडरीकला जर्मनीमधून हद्दपार केल्याचे जाहीर केलें, यानंतर फ़ेडरीकचें पॅलेटाईन संस्थान बव्हेरियाचा राजा मॅग्झिमीलन यास बक्षिस देण्याचें ठरवून, त्यास त्या संस्थानाचा कबजा घेण्याचा हुकूम दिला ! बादशहाच्या हुकुमाप्रमाणें मॅग्झिमीलन आपल्या फौजेनिशीं पॅले- टाईन प्रांतावर चालून आला तेव्हां या अरेरावीच्या व अन्यायाच्या कृती- बद्दल जर्मनीमधील सर्व प्रॉटेस्टंटपंथीय लोकांस चीड येऊन बादशहाविरुद्ध टक्कर देण्याचा त्यांनीं निर्धार केला. यावेळीं जर्मनीमधील युद्धांत भाग घेण्याची इतर युरोपियन राष्ट्रांत इच्छा उत्पन्न झाली. इंग्लंडचा राजा १ ला जेम्स याची मुलगी फेडरीकला दिली असल्यामुळे फ्रेडरीकचा प्रांत बळका- विण्याचा मॅग्झिमीलनचा विचार पाहून त्याच्या मदतीसाठी इंग्लंडहून मदत