पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८ वं. ] जर्मनीतील तीस वर्षे टिकलेले धर्मयुद्ध. १०५ विषयविवेचनाच्या सोर्यासाठीं मुख्यत्वेकरून चार विभाग पाडण्यांत येतातः ( १ ) बोहिमिया व पॅलेटाईन या दोन प्रातांमधील युद्धप्रसंग ( १६१८ ते १६२३ ), ( २ ) डॅनिश विभाग ( १६२५–१६२९ ), (३) स्वीडिश विभाग ( १६३० - १६३५ ), ( ४ ). फ्रेंच व स्वीडिश विभाग ( १६३५ - १६४८ ). ( विभाग १ ला . ) प्रेम शहरामध्यें बंडखोर लोकांनीं आपलें स्वतःचें राज्य स्थापन करून प्रॉटेस्टंट पंथीय मंडळास आपल्या मदतीस येण्याविषयीं विनंति केली. अशाप्रकारें बोहिमिया प्रांतांत बंडाळी सुरू वो हिमियामधील युद्धविस्तार. होऊन एक वर्ष झालें नाहीं तोंच १६९९ मध्यें मॅथिअस बादशहा मरण पावून त्यानंतर २ रा फर्डिनंड हा कर्तृत्ववान् बादशहा गादीवर आला. २ रा फर्डिनंड बादशहा. बादशहा २ रा फर्डिनंड रोमन कॅथलीक पंथाचा कट्टा | अनुयायी होता. जीजस्टपंथीय धर्माधिकाऱ्यांच्या हाताखालीं त्याचें लहानपणचें शिक्षण झाले असल्यानें रोमन कॅथलीक पंथाचा सर्वत्र प्रसार करून प्रॉटेस्टंट पंथाचा उच्छेद करणें हेंच आपले जीवितकर्तव्य आहे असें त्यास वाटल्यास त्यांत कांहींच नवल नव्हतें ! त्यानें गादीवर येतांच बोहिमिया प्रांतांतील बंडखोरांचा मोड करून तो प्रांत आपल्या राज्यास जोडण्याचा निश्चय केला; व आपणास या कामी मदत करण्यासाठीं त्यानें बव्हे- रियाचा संस्थानिक मॅग्झिमीलन याच्या नेतृत्वाखालीं स्थापन झालेल्या रोमन कॅथलीक संघाची मदत मागितली. फर्डिनंडप्रमाणें मॅग्झिमीलनही कर्तृत्ववान् असून रोमन कॅथलीक पंथाचा कट्टा अनुयायी होता; व फर्डिनंडला मदत करून बोहिमिया प्रांता- ७