पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०४ युरोपच अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण खटका उडणार असें स्पष्ट दिसूं लागलें; व थोडक्याच दिवसांत या दोन पंथांमध्यें खटका उडण्यास बोहिमिया प्रांतांत एक निमित्तकारण उप- स्थित झालें ! बोहिमिया हें संस्थान आस्ट्रियावर राज्य करणाऱ्या हॅप्सबर्ग घरा- ण्याच्या ताब्यांत असून, त्या संस्थानांत स्लाव्ह व जर्मन्स या दोन्ही जातींचें लोक रहात असत. जर्मनीमध्ये इतरत्र सुरू झालेल्या धर्मसुधारणेने गेल्या २५-३० वर्षांत प्रॉटेस्टंट पंथाचा या संस्थानावर बराच पगडा बसला होता... येथील लोकांस या पंथापासून परावृत्त करण्याच्या इरावानें न्यूडोल्फ बादशहानें आपणाकडून होईल. तितके प्रयत्नही केले होते; परंतु हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरून तेथें प्रॉटेस्टंट पंथ अधिकच जोरानें बोहिमिया संस्थानांतील गडबड - १६१८. पसरत चालला ! तेव्हां तेथील लोकांस धार्मिक बाबतींत कांहीं सवलती दिल्या नाहींत तर कदाचित् तेथें बंडही उपस्थित होईल अशी भीति वाटून न्यूडोल्फ बादशहानें एक जाहीरनामा काढून धार्मिक बाबतींत सवलती दिल्या असल्याचें प्रसिद्ध केलें (१६०९). परंतु न्यूडोल्फनंतर गादीवर येणाऱ्या मॅथिअस बादशहाकडून ( १६१२-१९ ) या जाहीरनाम्याप्रमाणें कांहींच कृति झाली नाहीं इतकेंच नव्हे तर उलट त्याच्या अमदानीत प्रॉटेस्टंट पंथीय लोकांचा विनाकारण छळ मात्र होऊं लागला ! तेव्हां तेथील लोकांनीं चिडून जाऊन १६१८ मध्यें बंड उभारलें; व प्रेग शहरांतील सरदार व बडेलोक यांच्या वाड्यावर हल्ला करून तेथील किल्ला आपल्या हस्तगत केला ! बोहिमियामधील बंडाची वार्ता ऐकतांच जर्मनीमधील दोन्ही पक्षांस युद्ध उपस्थित करण्यास सबळ कारण मिळून तीस वर्षे टिकणारें मोठें धर्मयुद्ध सुरू झालें. पहिल्या प्रथम या युद्धाचा विस्तार जर्मनीपुरताच होता, तरी हलके हलके युरोपमधील इतर राष्ट्रं त्यांत सामील होऊन हैं युद्ध सर्व युरोपखंडभर पसरलें. तेव्हां या तीस वर्षे टिकणाऱ्या युद्धाचे