पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ वें . ] फ्रान्समधील धर्मसुधारणेची चळवळ. १०१ लोकांस बोलाविलें; तरी देखील न डगमगतां त्यानें या लोकांच्या ताब्यां- तील तटबंदीचीं शहरें काबीज केलीं, व ला-रोशेल या समुद्रकिनाऱ्या- वरील भक्कम किल्ल्यास वेढा देऊन तो किल्ला हस्तगत केला. अशा प्रकारें ह्युगेनाट लोकांच्या हातीं असलेली राजकीय सत्ता हिरावून घेऊन नाँट- च्या जाहीरनाम्यांत प्रसिद्ध केल्याप्रमाणें केवळ धार्मिक सवलतीच या लोकांना दिल्यामुळे, इतःपर या लोकांकडून फ्रान्सच्या अनियंत्रित राज- सत्तेस मुळींच अडथळा आला नाहीं. रिशल्यू परराष्ट्रीय राजकारणांत हात घालतो. रिशल्यूनें अशारीतीनें फ्रान्सच्या अंतस्थ व्यवस्थेसंबंधीं आपले सर्व हेतु साध्य केल्यावर त्यास परराष्ट्रीय राजकारणांत हात घालून फ्रान्सचा दरारा सर्व युरोपभर बसविण्याचा प्रयत्न करतां आला. आस्ट्रियावर राज्य करणाऱ्या हॅप्सबर्ग घराण्याचें युरोपभर माजलेलें प्रस्थ कमी केलें तरच आपणास फ्रान्सचें वैभव व दरारा वाढवितां येईल हैं यास कळून चुकलें. त्यावेळीं जर्मनी- मध्यें मोठें धर्मयुद्ध सुरू असून सर्वत्र गोंधळ माजला होता, तेव्हां आपला इष्ट हेतु साध्य करण्यास हीच संधि उत्तम आहे, असें त्या धोरणी व दूरदर्शी मुत्सद्यास वाटून जर्मनी- मधील प्रॉटेस्टंट पंथीय संस्थानास मदत करून हॅप्सबर्ग घराण्याच्या नेतृत्वाखालीं असलेल्या रोमन कॅथलीक संस्थानांचा पराभव करण्याचें त्यानें ठरविलें. या युद्धांत सामील झाल्यामुळे फ्रान्सचा अतोनात फायदा झाला; तो इतका कीं, युद्धसमाप्ती- नंतर झालेल्या वेस्टफालियाच्या तहाच्या वेळीं ( १६४८ ) तर फ्रान्स करील ती पूर्व दिशा अशी स्थिति होऊन फ्रान्सला आपलें वर्चस्व सर्व युरोपभर स्थापतां आलें. परंतु दुर्दैवानें वेस्टफालियाचा ह रिशल्यू मरण पावल्यामुळे (१६४२) त्यास आपल्या मुत्सद्देगिरीस आलेलीं गोड फळें प्रत्यक्ष पहातां आलीं नाहींत !