पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ८ वें. जर्मनीतील तीस वर्षे टिकलेलें धर्मयुद्ध. सुत्न १५५५ सालीं आग्जबर्ग येथे झालेल्या तहानें कॅथलीक व प्रॉटे- स्टंट या दोन्ही पंथांमध्ये तडजोड व्हावी म्हणून करण्यांत आलेले प्रयत्न सिद्धीस न जातां, या पंथांमधील तीव्र कलह तसाच धुमसत राहिला. कारण आग्जबर्गच्या तहानें रोमन कॅथलीक पंथासच पक्षपात दाखविण्यास आला होता असे म्हणण्यास हरकत नाहीं ! एखाद्या धर्माधि- कान्याने जर प्रॉटेस्टंट पंथाचा अवलंब केला, तर त्यास आग्जबर्गच्या व्यव- 'स्थेनें आपल्या ताब्यांतील चर्चच्या व्यवस्थेचा व कारभाराचाही राजी- नामा देणें भाग पडे. परंतु अशाप्रकारें आपल्या जागेचा राजीनामा देणें म्हणजे आपल्या धर्मपंथाचे निर्बलत्वच कबूल करण्यासारखें आहे असें प्रॉटेस्टंट पंथीय धर्माधिकान्यांनीं तसें करण्याचें नाकारलें ! तेव्हां अर्थातच दोन्ही पंथांमध्यें वितुष्ट येऊन पुनः एकदां या धार्मिक प्रश्ना- संबंधीं जर्मनीमध्यें दुसरें एक धर्मयुद्ध उपस्थित होणार असें दिसूं लागलें. याखेरीज कॅव्हिनच्या पंथाचा जर्मनीमध्ये गेल्या पन्नास वर्षांत बराच प्रसार झाला असून, या पंथांतील लोकांस आग्जबर्गच्या तहानें कोणत्या - च प्रकारची धार्मिक सवलत ठेवली नसल्यानें, या पंथाच्या अनुयायांची 'फारच चमत्कारिक स्थिति झालेली होती ! वाटून अशाप्रकारें जर्मनीमध्ये त्या वेळीं दोन पंथ अस्तित्वांत असून त्यांचा आपसांत कलह असल्यामुळे तेथें धार्मिक बाबतींत अस्वस्थता होती. या वेळीं प्रॉटेस्टंटपंथांतील ल्यूथर व कॅल्व्हिन या दोन पुरुषांच्या अनुयायांनीं एकमेकांविषयीं मत्सरभाव न बाळगतां संघटित प्रयत्न केला असता, तर त्यांना जर्मनीमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करणें बरेंच सुलभ गेलें असतें. परंतु प्रॉटेस्टंटपंथांतील ल्यूथर व कॅल्व्हिन यांच्या अनुयायां-