पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० रिशल्यूची काम- गिरी. युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण मधील राज्यव्यवस्था सुव्यवस्थित व भक्कम पायावर उभारून राजसत्ता अनियंत्रित केली. १६२४ मध्ये १३ लुई वयांत आल्यावर त्याने राज्यका- भाराची सर्व सूत्रे आपल्या हातांत घेऊन त्याला मुख्य प्रधान नेमलें. रिशल्यूच्या हातीं राज्यकार- भाराची सर्व सूत्रे देऊन, त्याच्या व्यवस्थेंत मुळींच - व्यत्यय न आणल्यामुळें त्यास फ्रान्समधील अंतस्थ गडबड तत्काळ • मोडतां आली. रिशल्यू हा स्वदेशाभिमानी व स्वामिभक्त असून फ्रान्समधील • राजसत्ता अनियंत्रित करावयाची व अमीरउमरावांचें प्रस्थ कमी करून त्यांना - इतर लोकांप्रमाणेच निरुपद्रवी करून टाकावयाचें अशा प्रकारचे दोन हेतु त्यानें आपल्यापुढें ठेवले होते; व हे हेतु साध्य करण्यासाठीं त्यानें अविश्रांत परिश्रम केले. राज्यसत्ता अनियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत असतां त्यास - सरदार व अमीरउमराव यांच्याकडून बराच विरोध करण्यांत आला. सर- दार लोकांच्या हातांत असलेले राजकीय हक्क हिरावून घेत असतां, सर- -दार लोकांकडून त्याचा नाश करण्यासाठी बरेच कट रचण्यांत आले. परंतु रिशल्यूनें मुळींच न डगमगतां या कटाचा बीमोड करून त्यांतील पुढारी लोकांस फांशीं दिलें व सरदार लोकांची राजकीय सत्ता हिरावून घेण्यांत येते. इतरांस धाक घातला. या अमीरउमरावांप्रमाणेंच प्रॉटेस्टंट पंथीय ह्युगेनॉट लोकांकडून त्यास बराच अडथळा आला. नॉटच्या जाहीरनाम्यानें या लोकांना धार्मिक सवलती- बरोबर बरेच राजकीय हक्कही मिळाले होते. चवथ्या हेन्रीनें या लोकांच्या ताब्यांत तटबंदीची शहरें व किल्ले दिले असल्यामुळे त्यांच्या हातीं बरीच सत्ता होती. तेव्हां या लोकांच्या ताब्यांतील तटबंदीची शहरें हिरावून घेतलीं नाहींत तर त्यांच्याकडून राजसत्तेस वारंवार अडथळा येईल असें वाटल्यावरून रिशल्यूनें त्यांच्या ताब्यांतील शहरे घेण्याचा उपक्रम सुरू केला. परंतु त्याच्या अशा प्रकारच्या कृत्यानें चिडून जाऊन ह्यूगेनाट लोकांनीं रिशल्यूस प्रतिकार करण्यासाठीं आपल्या मदतीस इंग्लिश