पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ वें. ] फ्रान्समधील धर्मसुधारणेची चळवळ. ९९. वस्था नीट सुधारावी व राज्यकारभाराच्या सर्व खात्यांकडून योग्य काम- गिरी व्हावी असा हेतु मनांत धरून हेन्रीनें सले फ्रान्सची अंतःस्थ स्थिति सुधारण्याचा प्रयत्न. नांवाच्या एका प्रॉटेस्टंट पंथीय सरदारास आपल्या मंत्रिमंत्रळांत जागा दिली. या प्रधानाच्या मदतीनें हेन्रीनें जमाबंदीची नीट व्यवस्था लावली. देशां- तील उद्योगधंदे ऊर्जितावस्थेस आणण्याची खटपट केली. अशा रीतीनें सर्व खात्यांत माजलेली अंदाधुंदी नाहींशी केल्यावर फ्रान्सराष्ट्र संपन्न स्थितीप्रत येऊं लागलें. फ्रान्सनें आपली अंतः स्थिति सुधारल्यावर परकीय राजकारणांत हात घालून इतर युरोपियन राष्ट्रांवर आपला दरारा बसवावा असें हेन्रीला वाटू लागलें. परंतु त्याची ही इच्छा सफल होण्यापूर्वीच १६१० मध्ये एका धर्मवेड्या माथेफिरू गृहस्थानें त्याच्या पोटांत खंजीर खुपसून त्याचा वध केला ! हेन्रीनें फ्रान्समध्यें गोंधळ माजला असतांही आपल्या दृढ निश्चयानें, चिकाटीनें व मुत्सद्देगिरीनें फ्रान्सचें राज्यपद मिळविलें इत- केंच नव्हे, तर राज्यांतील सर्व अंदाधुंदी नाहींशी करून फ्रेंच राष्ट्र पूर्वस्थितीप्रत आणून सोडलें याबद्दल फ्रेंच लोकांस अजूनही त्याचे गोडवे गातात. हेन्रीनंतर त्याचा ९ वर्षांचा मुलगा १३ वा लुई गादीवर आला ( १६१० ते १६४३ ). लुई हा अगदीच अल्पवयी असल्यामुळे राज्यकार- भार चालविण्यास हेन्रीची दुसरी बायको 'मेरिया डी मेडीसी' हिच्या 'नेतृत्वाखालीं एक लहानसें सल्लागार मंडळ स्थापन करण्यांत आलें होतें. परंतु मेरीच्या अंगीं राज्यकारभार चालविण्याची मुळींच अक्कल नसल्या- मुळे राज्यकारभाराची सर्व सूत्रें खुषमस्करे लोक व प्रॉटेस्टंट पंथाचे अनु- यायी यांच्या हातांत जाऊन फ्रान्समध्यें पुनः गोंधळ माजतो कीं काय अशी भीति वाटू लागली ! परंतु या वेळीं रिशल्यू नांवाच्या पुरुषाने आपल्या कर्तबगारीनें व मुत्सद्देगिरीनें फ्रान्समध्यें गडबड होऊं दिली नाहीं इतकेंच नव्हे तर फ्रान्स-