पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आता केसं रंगवायचा आणि रिझल्टचा काय संबंध? इशा : आई, राणीची मम्मी तिला सगळ्याला नाहीच म्हणते. ट्रीपला नको, सॅन्डॉफ पार्टीला नको, केस रंगवायला पण नको, असं का गं? आई : इशा, तूच सांग का करत असेल राणीची मम्मी. इशा : अं, राणीच्या मम्मीला आवडत नसेल रंगीत केस किंवा त्यांचा मूड खराब असेल... किंवा ... आई : किवा त्या दुष्टच असतील इशा : नाही गं, खूप प्रेमळ आहेत काकू आई : मग त्यांना राणीची काळजी वाटत असेल. इशा : का? आणि मग मी विचारल्यावर तू का हो म्हणालीस? तुला नाही का माझी काळजी? आई : इशा, मी तुला १६ वर्षाच्या वाढदिवसाला परवानगी दिली, तुझ्या १२वी नंतर .... आता नाही.