पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इशा : काकू, एक विचारू ? तुम्ही राणीला केस रंगवायला का नको म्हटलात हो ? आई : ते काय बरं दिसतं का गं टोपलं? तुमचं काहीतरी चमत्कारिकच! तू तरी रंगवलेत का? इशा : मी १८ व्या बर्थ डेला रंगवणारेय की. आई : अगं, तेव्हाच तेव्हा. आत्ता १०वी नीट पास व्हा. काही शिकायचं बघा आणि राणीच्या बाबांनाही नाही आवडणार. राणी : पण का? आई : कारण त्यांना घराण्याच्या इज्जतीची काळजी आहे. राणी : बघ इथे मी केस रंगवले की यांची इज्जत जाणार. आई : एकदा आई-बापानं नाही म्हटलं की, ऐकत जा. वाद कशाला वाढवतेस राणी : अगं पण कारण तरी नीट सांग. दरवेळी आपलं घराण्याची इज्जत. आई : अगं गावातले काय म्हणतील, पोरगी घसरली वाटतं आणि तुझे केस पण बाद होतील. मात्रं झालं केसांच की लग्न ठरवताना पंचाईत. आमच्या वेळी नव्हती असली थेरं. राणी : (वैतागून) तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाही.