पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इशा : काकू मी निघते पण केस बाद होतायत असं वाटलं तर मी पण नाही रंगवणार केस, मात्र एकदा बघणार रंगवून... राणी : काही नको सांगू तिला... तिला काही पटतच नाही. स्वत:चंच खरं करते. मला तर तिला काही सांगायचीच इच्छा होत नाही. सारखं सगळ्याला 'नाही' आई : बरं, आता बास. जा... इशाला सोडून ये. राणी : इशा, माझ्या आईला मी आवडतच नाही. तिला सगळेच चूक वाटतंय. इशा : अगं चिल यार, तसं नाही. त्यांना काळजी वाटते. तू केस रंगवून, नखरे करून पोरांना लायनी देशील. ती पोरं तुला नादी लावतील. राणी : असं काही नाहीये. इशा : मग मगाशी संदीप, बाईक, काय चाललं होतं तुझं. अगं त्यांची गैंग लई डेंजर. तू खरंच नको नादी लागू.