Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
यंत्रशास्त्र.
___.____
अध्याय १.

 यंत्रशास्त्र हें दुसऱ्या सृष्टपदार्थशास्त्रांचा पाया अ- थवा आधार आहे असें मानितात ; आणि या शा- स्त्रास चलनाचे नियम हा मूलभूत आधार आहे, ह्मणून त्या नियमांचें ज्ञान झाल्यावांचून, प्रवाही आणि अप्रवाही पदार्थास चलन दिल्यानें जीं फळे होतात तीं समजणें, व जे परिणाम होतात त्यांची गणना करणें अशक्य आहे.

चलन आणि त्याचे नियम यांविषयीं.

 पदार्थाचा एके स्थानापासून दुसऱ्या स्थानाकडे जाण्याचा अथवा स्थिरताविरुद्ध जो व्यापार व्यास चलन ह्मणतात.

 पदार्थ स्थिर अवस्थेतून स्वतः चलन पावण्यास समर्थ नाहीं; आणि चलनावस्थेतून स्थिर होण्यास- ही समर्थ नाहीं. हा परिणाम पदार्थाचा जा ध- र्मामुळे घडतो त्या धर्मास जडता असें ह्मण- तात. पृथ्वीवरील इतर पदार्थांचा संबंधाने पाहिलें असतां भूगोलावरील कोणताही खडक आपले स्थान सोडीत नाहीं ; हें अनुभवावरून माहीत आहे. तो स्वतः चलन पावण्यास समर्थ नाहीं, ह्मणून जर त्यास