Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चलनाचे नियम - जडता.

औपाधिक प्रेरणेनें चलन प्राप्त न झालें, तर तो चिर- काल स्थिर राहील. आणि पदार्थात एकदां चलन प्राप्त झालें असतां त्याचे आंगीं स्थिर होण्याचें साम- र्थ्य नाहीं हेंही वरचे सारिखें खरें आहे. पदार्थ नि- जव आहे ह्मणून तो चलन आणि स्थिरता पावण्यास पात्र आहे; याजकरितां त्या दोनही स्थिति केवळ बा- हेरील कारणाचे आधारावर असाव्या. पदार्थ जा स्थितींत असतात त्याच स्थितीत राहतात, आणि त्यांची तो स्थिति बदलण्यास कांहीं प्रेरणा लागये, हैं पुढील दृष्टांतांवरून समजेल.

 जेव्हां घोडा एकादी मोठी जड गाडी प्रथम ओढूं लागतो तेव्हां त्यास तिचे जडतेचा मोड करावा ला गतो; परंतु हैं कृत्य एकवेळ झाल्यावर जी गाडी त्या-णे प्रथम मोठ्या प्रयासानें हालविली, तीतो पुढे सहज ओढीत नेतो. जी गाडी अतिवेगानें चालये ती निघत्येसमयीं तींत बसणारांचा आंगीं गाडीचा वेग येण्यास त्यांचा आंगाची जडता प्रतिबंधक होत्ये, ह्म- णून बसणारांचा मागे जातो; आणि जेव्हां ती गाडी थांबत्ये तेव्हां त्यांचा झोंक पुढे जातो. होडीचा सुकाणावर उभा राहणारा मनुष्य होडी चालू होते समयीं सावध नसला तर तो पाण्यांत पडेल; आणि होडी चालत असतां उभी राहिल्यानें तो आंत पडेल. गाडीचे मोठे वेगानें धांवणाराचे आंगीं जो वेग येतो तितका वेग आंत बसणाराचे शरीरांत आलेला असतो, ह्मणून त्या गाडीतून बसणाराने उडी टाकिली