Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
समवर्धमान चलन.

४७

हसा होत नाहीं, यामुळे जसजशीं ती गोळी प्रत्येक इंच पडत जाये तसतसे तिचा आंगीं अधिक चलन येतें. जर एक सेकंदांत ती गोळी सोळा फुटी आणि एक इंच इतक्ये स्थळांतून पडत्ये, तर तिला दुसऱ्या सेकंदांत पहिल्या अंतराचे तिप्पट स्थळांतून नेई इतका वेग तिचा आंगीं उत्पन्न होतो, तिसऱ्या सेकंदांत पां- चपट, चवथ्या सेकंदांत सातपट, पांचव्यांत नऊपट स्थळांतून नेई इतका वेग येतो. पदार्थाचा वर्धमान चलनाचें आणि जमीनीवर पडत्येसमयीं वाढलेल्या वेगा- घाताचें हैं वर लिहिलेले कारण आहे. अशा रीतीनें पदार्थास पडण्यास जो काळ लागतो त्याची गणना सहज करितां येत्ये; कारण जर तो पदार्थ आपल्या पतनकाळाचा पहिल्या सेकंदांत कांहीं स्थळांतून पड- तो, तर तो पहिल्या दोन सेकंदांत त्या स्थळाचा चौ- पट स्थळांतून पडेल, पहिल्या तीन सेकंदांत नऊपट स्थळांतून, पहिल्या चार सेकंदांत सोळापट स्थळांतून पडेल, आणि या प्रमाणानें पुढेही. यावरून जर कांहीं सांगितलेल्या सेकंदांत जा स्थळांतून पदार्थाचें पतन घडेल तें स्थळ काढणें असेल तर ; पहिल्या सेकंदांत जा. अवकाशांतून त्याचें पतन घडते, त्यास पतन का - ळांतील सेकंदांचा वर्गानें गुणावें, तो गुणाकार इच्छिले स्थळ परिमाण होईल.

 समवर्धमान चलन. - स्थिरपदार्थ गुरुत्व प्रेरणेनें जेव्हां खाली पडतो, तेव्हां जोपर्यंत त्याचें पतन अव- रोधावांचून घडते तोपर्यंत त्याचा वेग वाढते जातो,