Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
वर्धमान चलन.

पात्र पूर्ण भरिलें तर पिसाचे पतन मोकळ्या हवेतल्या पतनासारिखेच होईल.

 यावरून असे दिसतें कीं, जेव्हां गुरुत्वाचा व्यापार मोकळेपणाने घडतो, ह्मणजे प्रतिबंधावांचून घडतो, तेव्हां पदार्थींची वजने कशीही असोत आणि त्यांचा प्रकृत्यंशांचा जाती कशाही असोत, तथापि सर्व पदा- धींवर गुरुत्वाचा व्यापार समान शक्तीने घडतो. या- वरून निर्वात स्थलांत सोन्याचा वर्ख अथवा कागदाचा तुकडा इत्यादेि हलक्या पदार्थांपेक्षां शंभर शेर वजनाचा सोन्याचा गोळा असला तरी तो लवकर पडणार नाहीं.

 वस्तुतः सर्व पदार्थ एकाच वेगाने पडतात असें वर दाखविलें, आतां सर्व जातीचा पदार्थांचे पतन जा साधारण वेगाने घडतें, तो वेग कसा आहे हैं सांगतों. जर एक शिशाची गोळी उंच बुरुजाव- रून सोडून दिली, तर गुरुत्व प्रेरणेचा योगानें तिचा आगीं एकदां चलन उत्पन्न झालें असतां, त्याचा यो गानें ती गोळी पडत राहील; आणि सोडून दिल्यावर जर तें पतनकारण दूर केलें, तरीही ती गोळी पडत राहील; यास उदाहरण, जेव्हां ती गोळी अर्ध्या बुरु- जापर्यंत येथे, त्या समयीं जर तिचें गुरुत्व नाहीं में कर वेल, तर जा दिशेंत प्रथम तीस प्रेरणा घडली असत्ये, त्याच दिशेत ती गोळी प्रथमचलननियमाप्रमाणें पडत राहील; जसें एकादा दगड जा दिशेंन उडविला अस- तो, तो दुसऱ्या कांहीं नव्ये प्रेरणेवांचून त्याच दिशेत चालत असतो. गुरुत्व प्रेरणेचा व्यापार अगदीं ना-