Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८
आत्वूड साहेबाचे यंत्र.

असें वर दाखविलें. आतां जे पदार्थ मोकळेपणानें पडतात त्यांवें चलन इतकें त्वरित असतें कीं, तें पुर- तेपणी लक्षांत येत नाहीं ; याजकरितां वर्धमान निय- मांत कांहीं अंतर नपडतां पदार्थांचा वेग दृष्टीस येण्या- जोगा कमी व्हावा अशी कांहीं युक्ति पाहिजे. तशा युक्ती अनेक आहेत, त्यांतील प्रथम, एका गुळगुळीत आकृति १६. उतरणीवरून पदार्थ जाऊं दिल्याने तसे घडते, त्या उतरणीचा उतार असा असावा की तिजवरून जा ताना पदार्थाचा वेग पुरतेपणीं ध्या- नांत यावा; अथवा आत्वूड सा- हेबाने योजिलेल्या यंत्रानें तसें घ- डते. त्या यंत्रांत बाजूवरील २६ व्या In आकृतीप्रमाणें एक उभा खांब स आहे; अ आणि ब हीं दोन वजनें सारिख्याच आकाराचीं आणि स- मान वजनाची आहेत, आणि तीं एका बारीक रेशि- माचा दोरीचा शेवटांस बांधून ती दोरी क कप्पीव- रून अथवा चाकावरून सोडिलेली आहे. या कप्पीचा आंस घर्षणचक्रांवर आहे, यामुळे दृष्टीस येण्याजोगे घर्षण अगदीं नसतें. र एक कडी आहे, जींतून ब वजन जातें, आणि स पट्टी आहे तिजवर तें वजन पडत असतां येऊन बसतें. ती कडी आणि पट्टी हीं दोन्हीं खालीं वर सरतात, यामुळे तीं मळसूत्रांचा यो- गाने व बसवितां येतात. त्या उभ्या खांबावर