Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रुपया भाणि पीस.

४५


 जर पतन पावणान्या पदार्थांचा खऱ्या चलनाविषयीं निश्चय करणें आहे, तर वायु, पाणी इत्यादि प्रतिबंधक आणि गुरुत्वप्रेरणावरोधक पदार्थ नाहींत अशा स्थलांत त्यांचे पतन पाहावें हें अवश्य आहे. जेव्हां पदार्थस आकृति २५ हवेचा प्रतिबंध नसतो तेव्हां रुपया आणि पीस यांचा कृतीवरून पदार्थांचे पतन चांगल्या तऱ्हेने दाखवितां येतें. अ एक कांचेचे पात्र आहे, (आकृति २५) त्याजवर वायूचा प्रवेश न होऊं देणारे असें एक पितळेचें झांकण आहे; एक तारेचा क तुकडा वारा न जाऊं देई असा क अफ त्या झांकणांतून जाऊन एका पातळ लहान तुकड्यास उचलून आडवा धरितो, जो तुकडा ती तार फिरविली असतां खाली लोंबत राहतो; त्या पातळ तुकड्यावर इ एक रुपया आणि फ एक पीस हीं दोन ठेव; नंतर वाताकर्षक यंत्राने त्या पात्रांतील वायु काढून टाक, आणि तो तुकडा पडे अशा रीतीनें ती तार फिरीव असें केल्यानें त्या दोनही वस्तु पात्राचा बुडाशीं एक- दांच येऊन पडतील. त्या पात्रांत थोडासा वायु घे- तला असतां या कृतींत कांहींसा फेर होईल ; ह्मणजे त्या दोन पदार्थांचे पतनांत कांहीं अंतर दिसून येईल; ह्मणजे रुपयापेक्षां पीस सावकाश पडेल, जर अधिक वायु आंत येऊं दिल्हा तर पिसाचें पतन अधिक सा- वकाश होईल, आणि याप्रमाणे पुढेही ; जर वायूनें तें