Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रेरणकीकरण आणि प्रेरणापृथक्करण. अब रेघ अक रेघेचे दुप्पट अथवा तिप्पट लांब असा वी; आणि या पक्षी कर्ण, चौरसाचा होणार नाहीं, परंतु बाजूवरील आकृतीप्रमा णे समांतरचौकोनाचा होईल. आकृति ४. आणि याप्रमाणे पुढे कोणत्येही प्रमाणाचे प्रेरणेविषयींही दाखवि- तां येईल. - अ मिश्र प्रेरणांचा व्यापार आणि त्यांपासून उत्पन्न झालेलें चलन, ही दोन्ही एका लहानशा यंत्रानें सुरेख दाखवितां येतात; त्या यंत्राची आकृति बाजूवर का ढिली आहे. (आकृति ५ ) त्या यंत्रांत आकृति ५. दोन लांकडाचा हलक्या चौकटी एकावर एक सरत अशा आहेत; आणि एका चौकटीत एक आडवी तार आहे, जा ता- रेवर एक गोळा चालतो आणि त्या गोळ्यापासून एक दोरी दुसन्ये चौकटीकडे जाये, अशी कीं जेव्हां त्या चौकटी हलवाव्या, तेव्हां त्यांचे हालणें, ही एक प्रेर णा होत्ये, आणि दोरीचें ओढणें ही दुसरी प्रेरणा; या प्रेरणा झाल्या असतां असें दिसेल कीं तो गोळा एका चौकटीचा खालून वरती अथवा वरून खाली जातो, परंतु तो दुसरीचा कर्णावरून चालतो.- समांतर चौकोनाचा कर्ण कोणत्याही पक्षी त्या चौकोनाचा जवळ जवळचा दोन बाजूंबरोबर होत नाहीं, आणि जसा जसा त्या रेघांचा कोन वा. ढत जातो, त्याप्रमाणे कर्णाची लांबी कमी होत जात्ये,