Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
परिणामरूप प्रेरणा.

एक कोस गेलें, जसें अ पासून क पर्यंत ( आकृति ३ ) आणि नंतर लागलेंच भरतीनें एक कोस पूर्वेस गेलें, जसे क पासून डपर्यंत, तर तें तारूं आग्नेयीकडे अड रेघेत एकदाच लोटलें असतां जा ड स्थळाशी पोचेल त्याच ठिकाणी वर सांगितलेली गोष्ट झाली असतां जाईल. ह्मणून दोन प्रेरणा आणि त्यांचा दिशा दा- खविण्यासाठीं अ क आणि अ ब रेघा काढिल्या, आणि प्रत्येकीचा बरोबरीची रेघ दुसरीचा टोकास जोडिली, जसे, अकचा टोकास कड, अथवा अ बचा टोंकास बड, तर चौरस किंवा समांतर चौकोन पुरा होईल, त्याचे मधल्या रेघेस कर्णरेव असें ह्मणतात, ती त्या प्रेर- णांचें परिणामरूप आणि त्या प्रेरणांस अनुसरणारा जो पदार्थ त्याचा खरा मार्ग या दोन गोष्टी दाखवित्ये. -

 एकटी अड प्रेरणा यंत्रशास्त्राप्रमाणें अक आणि अब प्रेरणांचे बरोबर आहे, तीस परिणामरूप असें ह्मणतात; आणि अ क आणि अ ब प्रेरणांस तिचा का रणीभूत प्रेरणा ह्मणतात; जेव्हां कारणीभूत प्रेर- णांचे जागीं परिणामरूप प्रेरणा घेतात, तेव्हां त्या कृतीस प्रेरणकीकरण ह्मणतात. जा प्रेरणांची एका- दी प्रेरणा परिणामरूप आहे, त्या प्रेरणेचा बदल दोन अथवा अधिक प्रेरणांची योजना करितात, त्या कृतीस प्रेरणाकरण असें ह्मणतात.-

 जर त्या दोन प्रेरणा बरोबर आहेत असें न मानि- तां, जी प्रेरणा अला क कडे नेये तीहून बकडे नेणारी प्रेरणा दुप्पट अथवा तिप्पट मोठी असें कल्पिले तर,