Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गलबत - वारा आणि भरती.

१७

ईल, त्या कर्णाची लांबी आणि स्थान, अकड व चौ- रस पुरा करून, अ कोनापासून त्याचे समोरचा को- नापर्यंत अडकर्णरेघ काढल्याने निघेल; या पक्षीं त्या गोळ्यास एकच प्रेरणा देऊन त्या चौरसाचा कोण- त्याही एका बाजूवरून चालण्यास जो काळ पाहिजे तितकाच काळ त्यास अ ड कर्णावरून चालण्यास ला- गेल; जसें एक क्ष प्रेरणा जा काळांत अ गोळ्यास कजवळ नेईल, अथवा दुसरी प्रेरणा व जवळ नेईल त्याच काळांत तो गोळा ड जवळ जाऊन पोचेल- जी प्रेरणा अक रेघेंत घडसे, ती बड समांतर रेघेकडे त्या पदार्थाचे जाणें त्वरित किंवा हळू करीत नाहीं हें उघड आहे ह्मणून जर त्यास अक दिशेत चलन नसतां जा का- ळांत व जवळ जातो त्याच काळांत तो ड जवळ जा- ईल. त्यासारिखेच अव दिशेंतली प्रेरणा पदार्थास कड रेघेकडे किंवा तिजपासून दूर नेत नाहीं ; यावरून हैं नि- घतें कीं पदार्थ दोन प्रेरणामुळे कोठें तरों क ड आणि ड ब रेघांत असेल; ह्मणजे त्या रेघांचा छेदन बिंदू ड या स्थळीं असेल. एक तारूं पाठीवरचा वाऱ्याने दक्षि णेस जात आहे, आणि तें भरतीने अथवा पाण्याचा ओ- घानें पूर्वेस तितकेंच जलद लोटत आहे, तर ते प्रतिक्षणी किंचित् दक्षिणेस आणि किंचित पूर्वेस जाईल; ह्मणजे तें खचित् मधल्या आग्नेय दिशेस जाईल. वारा आणि भरती अशा जातीचा दोन प्रेरणा पदार्थावर एकदांच किंवा एका मागून एक घडल्या, तथापि परिणाम सारखाच होतो ; उदाहरण, जर एक तारूं वान्याने दक्षिणेस