Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
निरनिराळ्या दिशेंत घडलेल्या प्रेरणा.

जातीचे माप लावावें आणि सर्व वजनांस एकच जा- तीचें वजन असावे.

 वरचा दुसऱ्या आकृतींत प्रेरणोपपादक चौकोन सव, वह, हन आणि नस या रेघांनी झाला आहे, आणि समोरासमोरचे दोन कोन सांधणाऱ्या हस रेघेस कर्णरेघ ह्मणतात. समांतर चौकोनाचा सव आणि सन बाजू, एकत्र लागू होणाऱ्या प्रेरणांचे परिमाण आणि दिशा दाखवितात, आणि सह कर्ण त्याशीं स- मान प्रेरणा दाखवितो;- परस्परांस प्रतिबंधक अशा प्रेरणांनी तुलना होये हैं दाखवावे इतकाच या दृष्टां ताचा हेतु आहे; आतां भिन्नभिन्न दिशेत लाविलेल्ये प्रेरणांनी तुलना न होतां, चलन उत्पन्न होतें याचा विचार करितों. एका पदार्थावर दोन प्रेरणा निरनि- राळ्या दिशेत घडल्या असतां, त्यास त्या चलन दे- तात, याचे उदाहरण ही बाजूवरील आकृति आहे. एका अ पदार्थावर एक प्रेरणा केली अशी कीं ती त्यास कांहीं सांगितल्ये काळांत ब

जवळ नेईल; आणि लागलीच त्या- वर दुसरी प्रेरणा अक दिशेत केली जी व्यास वर सांगितल्ये काळांत क जवळ नेईल; असें झाल्यावर त्या य आकृति 3. क्ष व पदार्थावर केवळ एक शुद्ध प्रेरणा असावी तिचा ठि काणीं मिश्रप्रेरणा झाली, यामुळे तो पदार्थ कोणत्येही प्रेरणेचे दिशेत जाणार नाहीं ; कां कीं तो पदार्थ ब अथवा क कडे जावा तो न जातां अ ड कर्णरेषेंत जा-