Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०८
घर्षण.

वजनाचा खरबरीत बाजूचा लांकडाचा ठोकळा ठेविला, तर गाडी चालविण्यास जितकें वजन लागलें, त्यापेक्षां अधिक वजन हा तुकडा चालविण्यास ला- गेल. यावरून या दोन पक्षांत जे वजन लावावें लागतें, तें प्रत्येक पदार्थाचा घर्षणा बरोबर आहे. आतां या लां- कडाचा तुकड्यावर त्याचे वजनाचा दुसरा पदार्थ ठेवून त्याचे वजन दुप्पट केलें, तर पूर्वी जे वजन दोरीस बां- धिलें होतें, तें त्या पदार्थांचें घर्षण नाहींसें करण्यास पुरेसें होणार नाहीं असें दिसेल; परंतु पूर्वी प्रमाणें घर्षणाचा मोड करी असे दुसरें वजन टांगिलें, तर जे सर्व वजन घर्षणाचा मोड करितें तें पूर्वीचा वजनाचा दुप्पट आहे असें दिसेल. यावरून असें दिसतें कीं दुप्पट वजन झालें असतां दुप्पट घर्षण उत्पन्न होते.

 उतरणीचा सहायानें घर्षणाचे नियम चांगल्या रीतीने दाखवितां येतात. अब उतरणीवर लांक- डाचा ठोकळा व ठेव, आकृति १४३; यांत क ब फळीला अब फळी मिजागऱ्याने जडिली आहे, तेणे- करून ती फळी हवी तितकी उंच करितां येत्ये. तर अव उतरण हळु हळु उंच कर, जोपर्यंत तिची उंची आकृति १४३. अ अशी होईल की त्या उतरणी- वरून लांकडाचा तुकड्याची खाली येण्याची शक्ति घर्ष- ब णाचा मोड करी अशी हो- ईल, आणि त्यामुळे तो तुक-