Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
घर्षण.

२०९

डा सरकायास लागेल. यावरून उतरणीची अबलां- बी, जशी तिचा अक लंबोंचीस आहे, त्याच प्रमाणानें व तुकड्याचा सर्व वजनास त्याचा अब उतरणीवरून येणारा अंश होईल. जसें, जर अब लांबी १२ इंच आणि अक लंबोंची ३ इंच आहे, ह्मणजे लांबीचा चतुर्थांश उंची आहे, तर सर्व वजनाचा एक चतु- faraiबरीचा शक्तीनें तें वजन खालीं येऊ लागेल; ह्मणजे जर तें वजन १२ तोळे असेल, आणि उतर- णीची सपाटी केवळ गुळगुळीत असेल, तर तें वजन खालीं न येऊ देण्यासाठी ३ तोळ्यांची शक्ति उत रणीवरून त्या वजनावर लागू केली पाहिजे. सर्व यांत्रिक साधनांत घर्षण घडतें हें सांगण्याचे प्रयोजन नाहीं, आणि पूर्वी सांगितल्या प्रमाणे, त्यांचे परिणा- माचें गणित करित्ये समयीं पुष्कळ सूट द्यावी लागत्ये, ही सुचविण्याचें येथें कारण नाहीं. परंतु कांहीं यंत्रांत एकत्र येऊन घर्षण पावणारे अवयव थोडे अस- हात यामुळे तशा यंत्रांत घर्षण कमी असतें.

 उच्चाकांत घर्षण फारच कमी; कारण शास्त्ररी- तीनें तो एका बिंदूवर राहतो, आणि व्यवहारांत त्यास फार थोडें स्थळ लागतें.

 कप्पीचा दोर चाकावरून जातो आणि कप्पीचा चाकाचा आंस फिरतो, यामुळे कप्पींतही घर्षण कमी होतें; कष्पीचा आंसाचा फिरण्यापासून घर्षण होतें तें नाहीसे करण्यासाठी सोईस पडेल तितकी कप्पी मोठी करावी, कारण मोट्या कप्पीत घर्षणाचा ठिकाणापा-