Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
घर्षण.

२०७

तोळे आहे ; जेव्हां त्याची मोठी बाजू खालीं असत्ये, तेव्हां वर सांगितलेले वजन १६ चौरस इंचांवर पडतें, यावरून प्रत्येक चौरस इंचावर पाव तोळ्याचा भार पडतो. यावरून १ चौरस इंचावर पाव तोळ्याचें वजन असतां जो घर्षणापासून प्रतिबंध होतो, त्याचा १६ पट प्रतिबंध या पक्षांत घडेल. आतां अशी कल्पना करावी कीं तो तुकडा धारेवर ठेविला आहे, आणि पाव इंच चौरसावर ४ तोळे अथवा १६ पाव तोळे इतकें वजन आहे. परंतु सपाटी सारिखी असतां वजनाचा प्रमाणानें घर्षण वाढतें, असें अगोदरच सां- गितलें. यामुळे एक चौरस इंच सपाटीवर पाव तो- याचा भार असतां जितकें घर्षण होते, त्याचा १६ पट घर्षण या पक्षांत होईल; आणि हा तुकडा त्याचा सपाटीवर ठेवला असतां, त्यास इतकेंच घर्षण प्राप्त होईल असें पूर्वीच सिद्ध केलें आहे;-

प आकृति १४२. अ  या पुढील कृतीवरून घर्षणाचे नियम दाखवि तां येतील. अ सपाटी- वर ब लहान गाडी ठेव, ( आकृति १४२) आणि त्या गाडीस एक दोरी बांधून ती दोरी सपाटीशी समांतर प चाकावरून ने; असे केल्या- वर दोरीस अति लहान वजन टांगिलें असतां ती गाड़ी सपाटीवरून चालेल.जर गाडीचा जागीं तिचाच