Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
घर्षण.

२०३.

लागला असतो, त्याचा घर्षणानें तीं उघडण्यास कठीण जातात. याचसारिखें एकादें जुने तांब लागलेले कुलूप तशाच जुन्या किल्लीनें उघडायाचें असल्यास कुलुपांतून किल्ली फिरविण्यास मोठा श्रम पडतो. जीं मळसूत्रे फार दिवस फिरविल्यावांचून अथवा उपयोगांत आण- ल्यावांचून असतात, त्यांस फिरविण्यास ही फार श्रम पडतो.

 लोखंड, लांकूड, वीट, दगड इत्यादि पदार्थांचे दोन दोन तुकडे घेऊन, त्यांतून एक तुकड्याची उतरण करून त्यावर त्याच जातीचा दुसरा तुकडा ठेवितात, आणि तो दुसरा तुकडा उतरणीवरून खालीं रूं लागेपर्यंत त्या उतरणीचें एक टोंक वर करि- तात; अशा रीतीनें सजातीय पदार्थांचा घर्षणाची गणना करितात; उतरणीवरचा तुकडा सरकूं लाग- ल्याचे पूर्वी उतरणीचे उताराचा जो कोन असतो, त्यास विसाव्याचा कोन ह्मणतात.

 घर्षण पावणाऱ्या सपाटीचें घर्षण कमी करण्याचे उपाय हे पुढील आहेत. गरज लागेल त्याप्रमाणें ह्यां- तून एक एकाची योजना करावी किंवा अनेकांची योजना करावी.

 १. घांसणाऱ्या सपाट्या गुळगुळीत कराव्या; प- रंतु हा गुळगुळीतपणा कांहीं मर्यादेचा आंत असावा, कारण गुळगुळीतपणानें पदार्थ इतके जवळ येतात कीं तेणेकरून त्या दोन पदार्थांमध्यें स्नेहाकर्षण उत्पन्न होतें.