Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय १३.
घर्षण.

 यांत्रिक साधनांचा फळाची गणना करित्येसमयीं, त्यां- चा चालणारा अवयवांचें जें परस्परांवर घर्षण हो- तें, त्यासाठी पुष्कळ सुट द्यावी लागत्ये असें मागें सांगि तलें; परंतु यंत्रांतील घर्षणाचा परिणामाचा विचार अवश्य केला पाहिजे, ह्मणून तो विषय एका निराळ्या अध्यायांत सांगावा हैं योग्य.

 एका पदार्थाचा सपाटीवर दुसऱ्या पदार्थाचा स पाटीचा चालण्यानें जें फळ होतें त्यास घर्षण ह्मणतात; पदार्थांचा सपाटी जरी गुळगुळीत अशा दिसतात, तरी सर्व पक्षांत त्यांवर कांहींसा खरबरीतपणा अवश्य असतो; यामुळे जेव्हां दोन सपाट्या एकत्र होतात, तेव्हां एका सपाटीवरील उंचवटे दुसरीचा खाड्यांत जातात, आणि तेणेकरून चलनास प्रतिबंध होतो. यंत्रांत जे अवयव एकत्र असतात त्यांचा खरबरीतपणामुळे त्या यंत्राचा निरनिराळ्या अवयवांत घर्षण उत्पन्न होतें, आणि काळेकरून तें घर्षण भिन्नभिन्न कारणांनी वाढतें ; जसें लो- खंडास तांब लागल्यानें, लांकूड मऊ असल्यानें, अथवा कुजल्यानें, आणि दोर कठीण आणि ताठ असल्याने; दर- वाजांचीं अथवा खिडक्यांचीं बिजागरीं जीं फार दिवस उघडलीं अथवा हाललीं नसतात, त्यामुळे त्यांस जो जंग