Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०४
घर्षण.

 २. जे पदार्थ परस्परांवर घांसणार ते निरनिरा- ळ्या जातीचे असावे. उदाहरण, आंस तिख्याचे असतात आणि ते जांत फिरतात ते अवयव पितळेचे असतात. घडियाळें आणि त्यांसारिखीं दुसरीं लहान यंत्रे, यांत तिख्याचे आंस अकीक अथवा हिरा यांत फिरतात. तिखे आणि बर्फ यांत अतिशय भिन्नपणा आहे, यामुळे बर्फावर चालणाऱ्या मनुष्याचा गमनांत फार वरा असत्ये.

 ३.पदार्थांचा घर्षण पावणाऱ्या अवयवांमध्ये स्निग्ध पदार्थ घालावे; जसें तैलादि पदार्थ धातूंत घालावे ; साबू, चरबी लांकडाचा पेनशिलत में शिसें असतें तें, इत्यादि पदार्थ लांकडांत घालावे. साबू अथवा वरी यांचा योगानें घर्षण नाहींसें होतें याविषयीं एक च- मत्कारिक उदाहरण आहे. विलायतेंत सणाचा दि- वसांत एक खेळ करितात, त्यांत डुकराचा शेपटीस साबू लावितात, आणि ती बुळबुळीत शेप धरून जो त्या डुकरास धांवतांना धरील त्यास कांहीं इनाम कबूल करितात. याचसारिखा मुंबईत पैजांचा दिवशीही एक खेळ करितात, त्यांत एका गुळगुळीत खांबास चरबी लावून, त्याचा टोकास कांहीं रुपये बांधून तो खांब पुरितात, नंतर जो त्या खांबावर चढून बांधलेले रुपये घेईल त्यास ते इनाम देतात.

 ४ पदार्थांचा घांसणाऱ्या अवयवांचा विस्तार कमी करावा; जसें, आंसाचा जो भाग चाकांत फिरतो तो कमी करावा;