Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२००
मळसूत्र.

छापण्याचा कामांत मळसूत्राचा उपयोग होतो. त्याचा योगाने मोठा कापसाचा गठ्या दाबून लहान गांठो- ज्यासारिखा होतो, आणि कापूस हा सर्व पदर्थात हलका आणि पोकळ आहे, परंतु तो पाण्यांत बुडण्या जोगा जड होतो. कधीं कधीं लहान शक्तीची योजना मळ- सूत्रावर करून त्याचा योगाने मोठालीं तोललेली घरे नीट करितात. मळसूत्राचा योगानें लहान अंतरें मापितां येतात अथवा त्यां अंतरांचे विभाग करितां येतात; यामुळे त्याचा उपयोग ज्योतिषाचे कामांत फार पडतो. साधारण मळसत्राचा योगानें एक इंचाचे पांच हजार भाग होतात; परंतु ज्योतिषप्रकरणी यंत्रांस जीं तिख्याचीं पाणी दिलेली मळसूत्रे असतात, तीं या पेक्षां फार बारीक असतात. यापक्षीं अशा मळसू- त्रास सूक्ष्ममापकमळसूत्र असें ह्मणतात. सुताराचें भोके पाडण्याचें गिम्लेट, जास गिरमिट ह्मणतात आणि आगर ही दोन हातेरें मळसूत्राची उदाहरणें आहेत. यांत वाटोळ्या दाड्यांचा जागीं शंकूचा आ कृतीचे दांड्याभोंवतीं उतरण गुंडाळिलेली आहे असें मानितां येईल. हीं हातेरें टोकदार असतात, या- मुळे त्यांचे सामर्थ्य फार असतें. उसाचा रस काढ- ण्याचा चरक, जास मळसूत्राचा सूत्रासारिखीं सूत्रे असतात, तें या यंत्राचें अनुभविक उदाहरण आहे ; सारांश जा जा पक्षांत मोठ्या भारची किंवा वजनाची गरज लागल्ये तेथें मळसूत्राचा उपयोग करितात.-

 बूच काढण्याचें मळसूत्र हैं केवळ मळसूत्राचे सूत्र