Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मळसूत्र.

१९९

आकृतीत दाखविल्याप्रमाणें चाकाचा दांत्यावर केलेली असत्ये. या पक्षांत मळसू- त्रास अनंतमळसूत्र ह्मण- तात, कारण त्याचा व्यापार चाकावर अमर्याद काळप- र्यंत करितां येतो. या यंत्रांत दोन मूळ यंत्रांचा संयोग आहे, एक मळसूत्र आणि दु- सरे आंसास खिळलेले चाक. आडव्या अदांड्यावर सम- आकृति १४०. स व सूत्र आहे असें मनांत आण, आणि तें व चाकाचा दां यांत लागू केले आहे. आणि प फिरविण्याचा दांड आहे, व्यास शक्ति लावितात. यांत मळसूत्राचा कोणत्याही दोन सूत्रांमधील अंतर, चाकाचा कोणत्याहि दोन दांत्यांचा अंतरावरोवर मिळालें पाहिजे; असें असल्यावर चा काचा परिघास दोन दांत्यांचा अंतराइतक्या स्थळां- तून पुढे नेण्यासाठी मळसूत्रास पूर्ण एक फेरा दिला पाहिजे. जर व चाकास सोळा दांत्ये असतील, तर प हातानें अ दांडा आणि स मळसूत्र एक वेळा फिर- विलें असतां व चाक मळसूत्राचा योगानें एकदां त्या इतकें पुढे जाईल; आणि यामुळे दांड्याचा सोळा फेन्यांनीं, व चाक एक वेळा फिरेल.

 मळसूत्राचे उपयोग अगणित आहेत. —- रूपये, मोहोरा, पैसे इत्यादि धातूंचा तुकड्यांवर छाप उठ- विण्याकरितां मळसूत्राचा उपयोग करितात.सर्व