Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९८
मळसूत्र.

तीस बसविलेले म मळसूत्र हीं, दोन मळसूत्रांचा सूत्रां- तील अंतराइतक्या स्थळांतून खालीं जातात. हा परि- णाम उभयतांचा एकत्रव्यापारापासून घडतो. जर या दोन मळसूत्रांची सूत्रे अगदीं सारिखीं असलीं आणि जर फ उच्चालकास कांहीं शक्ति लागू करून कमळ- सूत्र फिरविलें, तर ब फळें आपल्या ठिकाणींच राहील; कारण लहान मळसूत्र जितकें वर येतें, तितकेच मोठें मळसूत्र खाली जाते; परंतु जर मोठ्या क मळसूत्राचा सूत्रांतील अंतरापेक्षां धाकट्या म मळसूत्राचा सूत्रांतील अंतर लहान असेल, तर, क मळसूत्राचा दोन सूत्रां- तील अंतर आणि म मळसूत्राचा दोन सूत्रांतील अंतर, या दोहोंचा अंतराइतक्या स्थळांतून फ उच्चालकाची एक फेऱ्याने व फळे खाली जाईल. यावरून जा . साध्या मळसूत्राचे सूत्रांतील अंतर, अशा दोन मळसू- त्रांचे सूत्रांतील अंतरांचे वजाबाकी बरोबर आहे, त्या मळसूत्राचे फळाबरोबर या जोड मळसूत्राचें फळ होईल हे उघड आहे; आणि यामुळे दोन मळ- सूत्रांचे सूत्रांतील अंतरांचे वजाबाकीस जसा फ स्थ- ळींचे शक्तीचे फिरण्याचा परिघ प्रमाण, तशी शक्ति वजनास प्रमाण होईल. वरचा सर्व वर्णनावरून असें लक्षांत येईल कीं या यंत्रांतील दोन मळसूत्रांचा अंत- रांची वजाबाकी कमी केल्याने याचा यांत्रिक स्वार्थ वाढवितां येईल. कधीं कधीं मळसूत्राचा सूत्राची योजना चाकी पुढे लोटण्याविषयीं नसत्ये, त्याची योजना १४० व्या