Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मळसूत्र.

१९५

सर्वदा सारिखा, एकाच दिशेत घडतो, आणि तोकधीही बदलत नाहीं.

 बाजूवरील १३७ वी आकृति स्थिर चापणी आहे, ती चापणी बुकें बांधणारे बुकें दावण्याक- रितां कामांत घेतात; आणि मळसूत्राने मोठा भार उत्पन्न होतो हे दाखविण्याचें हें चांगलें उदाहरण आहे.

आकृति १३७. अ  मळसूत्राचा टोंकावर जो आडवा उच्चालक बस- विला आहे त्याणें तें मळसूत्र फिरवितात; त्याचा खाल- वा टोकास क फळें बसविलें आहे, त्याचा योगानें भार घालितात; ह्मणून जेव्हां मळसूत्र एका बाजूनें फिरवितात तेव्हां स फळ्यावर जीं बुके असतात त्यांवर भार पडतो, आणि तेंच मळसूत्र दुसऱ्या बाजूनें फिर- विलें, तर तो भार नाहींसा होतो. या पक्षांत चाकी- चा ठिकाणीं ह आडवें लां- कूड आहे, आणि तें स्थिर आहे ह्मणून arat स्थिर आहे. पुढील १३८ व्या आकृतींत मळसूत्र स्थिर आहे आणि चाकी फिरव्ये. यंत्राचा चवकटीमध्ये ड फळें खालींवर होतें, आणि त्यास क व मळसूत्र खालीं वर करितें ; क व मळसूत्र
आकृति १३८.