Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९४
मळसूत्र.

हेत; जा उच्चालकानें मळसूत्र फिरवितात त्याची लांबी वाढविल्यानें ; अथवा त्याचा सूत्रांमधील अंतर कमी केल्यानें. आतां अशी कल्पना करावी की मळसूत्राचीं सूत्रे इतकी बारीक आहेत की त्यांतून कोणत्याही दोहों- मधील अंतर पाव इंच आहे, आणि त्या मळसूत्रास फिरविणाऱ्या उच्चालकाची लांबी १० फुटी ह्मणजे १२० इंच आहे, या उच्चालकाचा फिरण्यानें जें वर्तुळ होईल, त्याचा परिघ १०x६ = ६० फुटी, ह्मणजे ७२० इंच, ह्मणजे २८८० पाव इंच आहे. आणि मळसूत्राची उंची पात्र इंच आहे, ह्मणून वजनाचा गमनस्थळाचा २८८०. पट स्थळांतून शक्तीचें गमन होईल; यावरून उच्चालकाचा शेवटाशी १- शेराची शक्ति लागू केली असतां २८८० शेर उच- लितां येतील. मळसूत्राचा भागांचे घर्षण इतके आहे कीं शास्त्रार्थाप्रमाणें जें त्याचें फळ व्हावे, त्यापेक्षां व्यवहारांत फार थोडें दिसून येतें, ही गोष्ट येथें सां- गितली पाहिजे; कारण यंत्राचें घर्षण नाहींसें कर- ण्यासाठीं सर्व शक्तीचा एक तृतीयांश मिळवावा लागतो.

 मोठा भार उत्पन्न व्हावा व त्या भाराची क्रिया सा- रिखी व्हावी, आणि तो भारही तसाच राहावा यावि- षयीं सर्व मूळयंत्रांत मळसूत्रावांचून दुसरें चांगलें साधन नाहीं; कारण उच्चालकाची क्रिया निरंतर बदलत जात्ये, आणि त्यापासून जो भारउत्पन्न होतो, तो कालांतराने घडतो; परंतु मळसूत्राचा व्यापार