Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९६
मळसूत्र.

 खालीं वर होते, परंतु वाटोळे फिरत नाहीं. न चाकी ल उच्चालकानें फिरव्ये, आणि ती वाटोळी मात्र फिरव्ये, मळसूत्रा बरोबर खाली वर जात नाहीं. चाकीस एक पूर्ण वेढा दिला असतां, मळसूत्राचा जवळ जवळचा दोन सूत्रांमधील अंतरा इतक्या स्थळांतून मळसूत्र खाली किंवा वर होतें.

 शक्तीचा फिरण्यानें जें वर्तुळ होतें, त्याचा परिघ आणि मळसूत्राचा जवळ जवळचा दोन सूत्रांमधील अंतर, यांत में प्रमाण असतें, त्यावरून कांहीं दिले- ल्या शक्तीनें मळसूत्रांत किती वजन उचलण्याचें सा मर्थ्य आहे हे कळतें असें पूर्वीच सांगितले. यावरून जा उच्चालकाचा योगानें शक्ति लागू होत्ये, त्याच लांबी वाढविली असतां, अथवा मळसूत्राची सूत्रे बारीक करून जवळ जवळ केलीं असतां, मळसूत्राचा यांत्रिक स्वार्थाची वृद्धि करितां येईल हे उघड आहे. या दोन उपायांनीं यांत्रिक स्वार्थाची वृद्धि करण्यास शास्त्र- रीत्या जरी मर्यादा नाहीं, तथापि व्यवहारांत उच्चाल- काची लांबी वाढविल्यानें बहुधा अडचणी येतात; का रण त्या उच्चालकाचा टोंकावर शक्ति लागू होऊन तिला फिरण्यास जें स्थळ पाहिजे, तें फारच मोठे पडेल आणि दुसऱ्या तऱ्हेनें पाहिलें, ह्मणजे जर मूळ- सूत्राची सूत्रे बारीक केली, तर त्यांचा आंगीं इछिलें वजन धरण्याचें सामर्थ्य राहणार नाहीं. १३२ पृष्ठावर जो आंसासखिळलेल्ये चाकाचा प्रकार सांगितला, त्यांत लहान प्रेरणेनें मोठी प्रेरणा संभाळिली जावी