Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाचर.

१८७

आणि तो व्यवहारांत अनुभवास येत नाहीं,ह्मणून तो येथे लिहिला नाहीं.

 व्यवहारांत जितक्या तहांनीं या यंत्राची योजना आहे, त्यापेक्षां अधिक तन्हांनी दुसऱ्या कोणत्याही यंत्राची योजना नाहीं. विंधणीं, खिळे, सुया, कुन्हाडी, तर वारा इत्यादि हातेरांस पाचरेचा मूळ आधार आहे. जेव्हां इतर मूळ यंत्रे लागू पडत नाहींत, तेव्हां पाच- रेचा उपयोग अनेक प्रकारांनी करितात. पाचरेची प्रेरणा मुख्यत्वेकरून टोल्यांनी घडत्ये हें वरचा गो- ष्टीचें कारण आहे; उच्चालकावर भार घालण्यापेक्षां एकाद्या टोल्याचा वेगाघात फार अधिक असतो. पाचरेची शक्ति अतिशय असत्ये हे दाखविण्यासाठीं अनुभविक उदाहरण लिहितों. मोठाली गलबतें सुक्या जमीनीवर असतात, त्यांचा बुंधाखाली पाचरा ठोकल्यानें तीं सहज उचलितां येतात. उंच दिप- माळा अथवा इमारती जमीनीचा ओलेपणामुळे एक बाजूस तोलतात, त्यांचा त्या बाजूस पाचरा ठोकून त्यांस सरळ करितात. पाचरेचा उपयोग दगड सोडविण्यांत करितात; कारण उच्चालक, आंसास खिळलेले चाक, अथवा कप्पी यांचाने हे कृत्य होण्यास अशक्य; धक्का अथवा टोला यांचा योगानें दगडाचे डकलेले अवयव हलतात आणि तेणेंकरून ते सहज निराळे होतात. मैसूरचा राज्यांतील संगमरवरी द गड अथवा जा प्रांतांत मोठ्या जांत्याचे दगड निघ-घतात,ते सोडवितांना दगडांचा बाजूंस भोंकें करून