Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८८
पाचर.

त्यांत सुख्या लांकडाचा पाचरा मारितात; नंतर ज- मीनीचा ओलेपणामुळे अथवा वर पाणी घालून त्या पाचरा फुगवितात, तेणेंकरून एक किंवा दोन दिव सांत सगळा दगड फुटल्यावांचून सुटतो. घरे बां- धणारे परांचा बांधियेसमयीं दोर अडच होण्याकरि- तां परांचिचे वांसे आणि त्यांस बांधलेले दोर यांमध्ये पाचरा मारितात.

 जेव्हां कांहीं वस्तु चाकूनें चिरतात, तेव्हां तो पाचरसारिखा आहे असें मानितां येईल; परंतु जर सूक्ष्मदर्शक यंत्रानें चाकूची धार पाहिली, तर ती बारीक करवती सारिखी आहे असें दिसेल, आणि अनुभवासही तशीच गोष्ट येथे, ह्मणजे जो पदार्थ चिरायाचा असतो त्याजवर चाकूचा धारेनें पाचरेप्र- मागें व्यापार केला, तर जें फळ दिसून येतें, व्याजपेक्षां, त्या पदार्थावर चाकू घांसला असतां अधिक फळ होतें.

 मोठाले लोखंडाचे आणि तांब्याचे खिळे ठोक- ल्याने आणि नुसत्या भारानें किती जातात, याविषयीं पोर्तस्मौथ येथील गोदीत जे प्रत्यक्ष प्रयोग केले आ- हेत, त्यांवरून असें दिसून आले आहे कीं, जा हातोड्याचा दांडा ४४ इंच लांब आणि त्याचें वजन २७ शेर आहे, त्याचा योगानें सामान्य पक्ष बळकट मनुष्य, एक जाडा खिळा प्रत्येक टोल्यास एक अष्ट- मांश इंच लांकडांत घालवितो; आणि जर त्या खिळ्यावर सुमारें ४२८ खंडींचें वजन ठेविलें, तर तो तितकाच आंत जाईल; परंतु हैं वजन किंचित् वाढविलें असतां तो खिळा अगदीं आंत जाईल.